Goa Crime News: पुतण्याने भोसकल्याने काकाचा दुर्दैवी मृत्यू

Goa Crime News: कौटुंबिक वाद : दापट-लोलयेत खळबळ
Goa Crime News |Goa News
Goa Crime News |Goa NewsDainik Gomantak

Crime News: काणकोण तालुक्यातील दापट-लोलये येथे पुतण्यानेच सख्ख्या काकाचा कौटुंबिक वादातून सुऱ्याचे सपासप वार करत खून केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याला उद्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जानू सोनू खरात (वय 42) असे मृताचे नाव असून हल्लीच विदेशातून घरी आलेला त्यांचा पुतण्या अजय खरात (वय 27) यांचे सकाळी कौटुंबिक वादातून काकाशी भांडण झाले. यावेळी त्याने सुऱ्याने सपासप वार करत काका जानू खरात यांना भोसकले.

ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अजय यांच्या घराच्या अंगणात घडली. जखमी अवस्थेतच जानू खरात यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया आणि काणकोणचे विभागीय पोलिस अधीक्षक संदेश चोडणकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

Goa Crime News |Goa News
Goa Fraud News: धान्यसाठा कोणाचा? आज होणार उलगडा

पोलिसांनी जानूचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सोमवारी अजयला रिमांडवर घेण्यासाठी काणकोण न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमके काय घडले?

अजयचे वडील मनोरुग्ण असून शनिवारी घरात वाद झाल्यानंतर अजयने त्यांना घरातून बाहेर काढले. सकाळी काका जानू जाब विचारण्यासाठी अजयच्या घरी आले असता, त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यावेळी जानू यांनी अजयची आई आणि बहिणीला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या अजयने घराच्या अंगणात जानू यांना सुऱ्याने भोसकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com