Goa Enironment: काणकोणात मासळी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्‍यांचा वापर

Goa Enironment: पालिका दरदिवशी सुमारे पाच टन कचऱ्याचे संकलन करते.
Plastic Ban| Goa News
Plastic Ban| Goa NewsDainik Gomantak

Goa Enironment: काणकोणात सिंगल यूज प्लास्टिक पिशव्‍यांचा वापर मासेविक्रेत्यांकडून सर्रास होत आहे. मात्र या वापराला विक्रेत्यांपेक्षा ग्राहकच जास्त जबाबदार आहेत असे म्‍हटले तर ते वावगे ठरणार नाही.

काणकोण पालिका दरदिवशी सुमारे पाच टन कचऱ्याचे संकलन करते. त्यात किमान अडीच ते तीन टन घनकचरा असतो. त्यात प्लास्‍टिक पिशव्यांसह थर्मोकोलचाही समावेश आहे, असे काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले. दरदिवशी घरोघरच्‍या कचऱ्याचे संकलन पालिका करीत आहे.

शिवाय आगोंद, लोलये, पैंगीण, श्रीस्थळ या पंचायत क्षेत्रात प्रत्येक आठवड्यातून एकदा कचरा संकलन करण्यात येतो. घनकचरा साठविण्यासाठी काळ्या पिशव्याही नागरिकांना देण्यात येत आहेत. खोतीगावात प्लास्‍टिक कचऱ्याच्या समस्येने अद्याप डोके वर काढले नसल्याचे सरपंच आनंदू देसाई यांनी सांगितले.

काणकोणात पोलिसांकडून सिंगल यूज प्लास्‍टिकमधून मालाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईत प्रामुख्याने मासेविक्रेते हे लक्ष्य बनविले जात आहे.

Plastic Ban| Goa News
Single Use Plastic Ban: डिचोलीत प्लास्टिकबंदीचे वाजले तीनतेरा

बागायतदार संस्था व अन्य काही विक्रेते सामान पॅकिंगसाठी कायद्यानुसार 51 मायक्रोनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. प्लास्टिकचे स्ट्रॉ, कप, चमचे, सजावटीसाठीचे थर्माकोल यासारख्या वस्तूंवर 1 जुलैपासून बंदी लागू करण्यात आली आहे.

"काणकोण पालिका दरदिवशी सुमारे पाच टन कचऱ्याचे संकलन करते. त्यात किमान अडीच ते तीन टन घनकचरा असतो. त्यात प्लास्‍टिक पिशव्यांसह थर्मोकोलचाही समावेश असतो.पालिकेकडून दंडात्‍मक कारवाई सुरू आहे."

- रमाकांत नाईक गावकर, काणकोण नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com