Ramesh Tawadkar: 'लोकाेत्सव हा केवळ महोत्सव नव्हे तर विचार आहे'

Ramesh Tawadkar: पूर्वतयारी, जागृतीबाबत मडगावात बैठक
Ramesh Tawadkar | Goa News
Ramesh Tawadkar | Goa News Dainik Gomantak

Ramesh Tawadkar: येत्या 7 ते 11 डिसेंबर या पाच दिवशीय कालावधीत आदर्श ग्राम आमोणे, काणकोण येथे आदर्श युवा संघातर्फे आयोजित ‘लोकोत्सव 2022’ हा केवळ महोत्सव नसून तो एक विचार असून या सोहळ्याला दोन लाखाहून अधिक लोकांचा सहभाग लाभणार आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

लोकोत्सवाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची माहिती व रूपरेषेबद्दल मडगाव, फातोर्डा व कुडतरी येथील लोकांमध्ये जागृतीसाठी आज मडगावात रवींद्र भवनात बैठक झाली. त्यावेळी तवडकर यांनी मार्गदर्शन केले. तवडकर म्हणाले, की लोकोत्सव हा लोकांसाठी केलेला उत्सव आहे. याद्वारे काणकोणबरोबरच गोव्याचा विकास साधण्याचा विचार आहे.

काणकोण भागातील शिक्षण संस्था, शेतीचा विकास करण्यास सुरू असलेले योगदान, काणकोणला शैक्षणिक हब बनवण्यासाठी प्रयत्न, तसेच गोव्याच्या संस्कृतीचे व परंपरेचे संवर्धन करण्याचा विचार या लोकोत्सव आयोजनामागे आहे. येत्या 2030 पर्यंत काणकोणला सर्व साधन सुविधांनी युक्त कसे बनवता येईल, याचाही या लोकोत्सवात विचार केला जाईल.

या बैठकीला माजी आमदार दामोदर नाईक यानीही मार्गदर्शन केले. बैठकीला नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक, मडगाव, फातोर्डा, कुडतरी भाजप मंडळाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ramesh Tawadkar | Goa News
Konkan Railways Train Schedule : ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकणकन्या रखडली; कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक

12 राज्यांतील कलाकारांना आमंत्रण !

या लोकोत्सवात सहभागासाठी 12 राज्यातील कलाकारांना आमंत्रित केले जाईल. त्यामुळे इतर राज्यातील कलेबरोबरच गोव्याच्या कलेचेही सादरीकरण होईल. लोककला, पारंपरिक रुढी,खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन या लोकोत्सवात केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com