Goa Group Farming: काणकोणात सामुदायिक 'शेती'

Goa Group Farming: काणकोणमध्ये सामुदायिक शेती पुरातन काळापासून करण्यात येत आहे.
Canacona Farm
Canacona FarmDainik Gomantak

Goa Group Farming: सामुदायिक शेती हा नवा प्रयोग नसला, तरी त्याला आता केंद्र व राज्य सरकारच्या कृषी खात्याचे पाठबळ लाभल्याने पडीक जमिनी राज्यात लागवडीखाली येऊ लागल्या आहेत. हा प्रयोग काणकोणात यशस्वी होऊन दोन वर्षांत तेरा सामुदायिक शेती गट तयार झाले आहेत. या योजनेखाली काणकोणात 30 हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. या सर्व सामुदायिक शेती गटात 220 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

वेगवेगळ्या कारणांसाठी पडीक ठेवण्यात येणारी जमीन लागवडीखाली आणण्यासाठी शेतकरी गट तयार करून त्यांना कृषी (Agriculture) खात्यातर्फे नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर शेतकरी गटाला शेतीच्या विकासासाठी अनुदान तत्त्वावर आर्थिक मदत केली जाते. प्रामुख्याने वन्यप्राणी, गुरे यांच्या उपद्रवामुळे शेतकरी जमिनीत लागवड करत नव्हते, त्या शेतकऱ्यांना एकत्र आणून एका परिसरातील सर्व जमिनीसाठी एकत्रित तारेचे किंवा विद्युतभारीत कुंपण उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

गेल्यावर्षी राज्यात दहा सामुदायिक शेती गट होते. त्यामध्ये 172 शेतकरी होते. त्या गटांनी 76.4 हेक्टर जमीन लागवडीखाली आणली. त्या गटांना सामूहिक कुंपण, अवजारे खरेदी करण्यासाठी 1.40 कोटी रुपयांची आर्थिक मदत कृषी खात्याने केली.

Canacona Farm
कोथिंबीर १० रुपयांनी महागली

* सत्तरीतही काटेकणगांची लागवड

सत्तरीतील (Salcete) पेळावदा रावण येथील सहा शेतकऱ्यांनी काटेकणगांची लागवड करण्यास पुढाकार घेतला आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. महादेव गावस, राजेंद्र जाधव, विठ्ठल मोरजकर, मनोहर माईणकर, मडसो हिंदे व कविता जाधव अशी या सहा शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी सुमारे दीड एकर जमिनीत आपली स्वतंत्रपणे काटेकणगा व इतर भाजीपाल्याची शेती फुलवली आहे. रानटी प्राण्यांचा होणारा हैदोस रोखण्यासाठी ते आपल्या या लागवडीची सामुदायिकरीत्या राखण करीत आहेत.

* काणकोणात सर्वाधिक शेती गट

सामुदायिक शेती (Farm) प्रयोग वेगवेगळ्या कारणांमुळे पडीक असलेल्या जमिनीच्या बाबतीत वरदान ठरत आहे. दरवर्षी सामुदायिक शेती योजनेखालील जमिनीत वाढ होत आहे. त्याचबरोबर सामुदायिक शेती गटातील शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. काणकोणमध्ये गेल्यावर्षी तीन सामुदायिक गट होते. त्यांत यंदा वाढ होऊन ती संख्या तेरावर पोचली आहे. संपूर्ण राज्यात सर्वाधिक सामुदायिक शेती गट काणकोणमध्ये असल्याचे विभागीय कृषी अधिकारी कीर्तिराज नाईक गावकर यांनी सांगितले.

Canacona Farm
थायलंड ठरला 'गांजा'ला कायदेशीर दर्जा देणारा आशियातील पहिला देश

* सामुदायिक शेतीचा इतिहास

राज्याच्या उर्वरित भागाबरोबरच काणकोणमध्ये सामुदायिक शेती पुरातन काळापासून करण्यात येत होती. स्थानिक भाषेत तिला सावड तसेच कुमेरी या नावाने प्रचलित होती. कुमेरी शेती पद्धत काळाच्या ओघात पडद्याआड गेली. मात्र, सामुदायिक भात शेती, ऊस शेती पद्धती अजूनही काणकोणात (Canacona) चालू आहे. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील बडसरे वाड्यावर भात शेती याच तत्त्वावर केली जाते. राज्याच्या काही भागात काटेकणगांची शेतीची लागवड व त्यांची राखण सामुदायिक पद्धतीने केली जाते. शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतीच्या जागी मचाण घालून आळीपाळीने पिकांची राखण केली जाते.

Canacona Farm
Sonali Phogat Case : सोनाली हत्या प्रकरणात संशयितांच्या कोठडीत वाढ

30 लाख रुपयांचा निधी: आजपर्यंत काणकोणमधील तेरा सामुदायिक शेतकरी गटांसाठी सुमारे 30 लाख रुपयांचा निधी पुरविण्यात आला आहे. कुंपण त्याचप्रमाणे पॉवर टिलर (power tiller) व अन्य अवजारे खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. सध्या या योजनेखाली काणकोणात 30 हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. या सामुदायिक शेती गटात 220 शेतकऱ्यांचा समावेश आहे, असे विभागीय कृषी अधिकारी कीर्तिराज नाईक गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com