Goa Carnival: गोमंतकीयांनो खा,प्या मजा करा! या दिवसांंमध्ये असणार गोव्यात "कार्निव्हल" ची धूम

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात थोड्या उशीराने पण उन्मत्त अशा कार्निव्हल उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

पणजी: कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात थोड्या उशीराने पण उन्मत्त अशा कार्निव्हल उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीपासून ते 4 मार्च पर्यंत या उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे पर्यटनमंत्री मनोहर “बाबू” अजगावकर यांनी बुधवारी सांगितले.

गोवा सरकार पुरस्कृत राज्यातील फ्लोट परेड असलेल्या नेहमीच्या सहा ठिकाणी या फेस्टीवल ला परवानगी नाकारली आहे. म्हणून यंदा हा महोत्सव केवळ दोन प्रमुख शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे. गोवा राज्याची राजधानी पणजी आणि दक्षिण गोव्यातील मडगाव या दोन शहरात हा उत्सव साजरा केला जाणार आहे, असे अजगावकर यांनी सांगितले. लोकांना कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करून प्रोटोकॉल फॉलो करून मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील, असे ते म्हणाले.

गोव्याचे कार्निवल परेड हे आशिया खंडातील एकमेव परेड आहे जिथे पोर्तुगीजांकडे असलेल्या वसाहती व व्यापारिक पोस्ट चे दर्शन दिसून येते. गोव्याच्या पर्यटन विभागाने आणि पणजीच्या महानगरपालिकेने घेतलेल्या बैठकीत हा उत्सव साजरा करण्याचे मान्य केले आहे.

“गोवा सरकारने असा निर्णय घेतला आहे की आम्ही कार्निवलसह पुढे जाऊ. लोक बर्‍याच दिवसांपासून घरात अडकले आहेत आणि त्यामुळे असे उत्सवही साजरे केले नाही. म्हणून बाहेर येण्याची आणि थोडा आनंद घेण्याची ही संधी आहे. लोकांनी पण आता स्वत:ची काळजी आणि खबरदारी घेणे सुरू केले आहे. कोरोना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत हे आता लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही अशी मला अपेक्षा आहे,” असे पणजीचे नगराध्यक्ष उदय मडकईकर म्हणाले. “अद्याप कोरोना संपलेला नाही, पूर्वीच्या तुलनेत कोरोनाची प्रकरणे कमी झाली असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व उपाय केले जातील आणि नियमांचे पालन केले जातील. आम्ही गोमंतकीयांना काळजी घेण्याचे आवाहनही करू, ”असेही त्यांनी नमूद केले आहे.

फ्लोट्स उत्सवाचे नेतृत्व किंग मोमो या मेस्कॉटने केले. तीन दिवस गोमंतकीयांनी हा उत्सव साजरा करण्याची संधी किंग मोमो ने दिली आहे. त्याचबरोबर लोकांना 'खा, प्या आणि मजा करा!' अशी घोषणाही केली आहे. गोव्याचे जीवन आणि संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा हा उत्सव आहे. फ्लोट परेड्सशिवाय, हा उत्सव नृत्य आणि सामुदायिक, सांस्कृतीक कार्यक्रमांद्वारे देखील साजरा केला जातो.

पर्यटन विकासासाठी गोवा सरकारने मागितली केंद्राकडे मदत - 

 

 

संबंधित बातम्या