गोवा कॉर्निवल: 'पर्यटन वाढीसाठी कॉर्निवल सारख्या सोहळ्याची गरज'

 गोवा कॉर्निवल: 'पर्यटन वाढीसाठी कॉर्निवल सारख्या सोहळ्याची गरज'
Goa Carnival Carnival ike festivities needed to boost tourism

पणजी : पणजी कॉर्निवल मिरवणूक आज जोशात सुरु झाली. उपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी मांडवी पुलाजवळ कॉर्निवल मिरवणूकीला झेंडा दर्शवून व हवेत फुगे सोडून मिरवणूकिचे उदघाटन केले. यावेळी महापौर उदय मडकईकर, पर्यटन खात्याचे संचालक मिनीनो डिसोझा, अधिकारी दिपक नार्वेकर आदी उपस्थित होते. शो मस्ट गो आन म्हणत आजगावकर यांनी उदघाटन केले. ''गोवा राज्य पर्यटन राज्य असल्याने पर्यटन वाढीसाठी  कॉर्निवल सारख्या  सोहळ्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.''

सध्या ही मिरवणूक एक किलोमीटर लांब आहे. लोकांना चित्ररथ व्यवस्थित पाहता यावेत यासाठी मंद गतीने हे चित्ररथ पुढे नेले जात आहेत. प्रेक्षकांचा उपद्रव या मिरवणुकीला होऊ नये यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अडथळे उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रेक्षकांना बसता यावे यासाठी सरकार आणि इतर संस्थांकडून बैठकीची वकरण्यात आलेली आहे. मांडवी नदीच्या किनार्‍यावरून जाणाऱ्या या रस्त्यावर ही मिरवणूक असल्याने हा रस्ता आता गर्दीने फुलून गेलेला आहे. एरवी गोव्यात आठवडाभर कार्निव्हल महोत्सव चालतो. विविध शहरात त्याच्या मिरवणुका होतात मात्र यंदा मडगाव व पणजी अशा दोन ठिकाणी मिरवणूका आहेत. उद्या रविवारी मडगाव येथे मिरवणूक आहे .त्यानंतर कार्निवल महोत्सवाची सांगता होईल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com