गोवा कॉर्निवल: कार्निवल मिरवणुकीस पणजी शहरातून सुरुवात

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

 कार्निवल मिरवणुकीस आज गोव्याची राजधानी पणजी शहरात सुरुवात झाली.

पणजी : ठेका धरायला लावणारे संगीत आणि रंगीबिरंगी पोशाखांनी लक्ष वेधून घेणारे नर्तक यांच्या सहभागाने कार्निवल मिरवणुकीस आज गोव्याची राजधानी पणजी शहरात सुरुवात झाली. मांडवी पुलाच्या खालून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 31 चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त अनेक पथके या मिरवणूकीत आहेत. कांपाल जवळ या मिरवणुकीची सांगता होणार आहे कार्निवल मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थानिक व पर्यटक रस्त्याच्या दुतर्फा भरून भर उन्हात एकत्र झालेले आहेत. कार्निवलची मिरवणूक सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालणार आहे. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांनी पुरेसे शारीरिक अंतर पाडावे असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून वारंवार करण्यात येत आहे.

गोवा कार्निवल: महोत्सवाची तयारी पूर्ण; सरकार 60 लाख 35 हजार करणार रुपये खर्च

मिरवणुकीच्या सर्वात पुढे किंग मोर्चा चित्ररथ आहे. सध्या ही मिरवणूक एक किलोमीटर लांब आहे. लोकांना चित्ररथ व्यवस्थित पाहता यावेत यासाठी मंद गतीने हे चित्ररथ पुढे नेले जात आहेत. प्रेक्षकांचा उपद्रव या मिरवणुकीला होऊ नये यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अडथळे उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रेक्षकांना बसता यावे यासाठी सरकार आणि इतर संस्थांकडून बैठकीची वकरण्यात आलेली आहे. मांडवी नदीच्या किनार्‍यावरून जाणाऱ्या या रस्त्यावर ही मिरवणूक असल्याने हा रस्ता आता गर्दीने फुलून गेलेला आहे. एरवी गोव्यात आठवडाभर कार्निव्हल महोत्सव चालतो. विविध शहरात त्याच्या मिरवणुका होतात मात्र यंदा मडगाव व पणजी अशा दोन ठिकाणी मिरवणूका आहेत. उद्या रविवारी मडगाव येथे मिरवणूक आहे .त्यानंतर कार्निवल महोत्सवाची सांगता होईल.

संबंधित बातम्या