गोवा कार्निवल: कार्निवल निमित्त पणजी महानगरपालिकेकडून दहा हजार मास्कचे मोफत वितरण

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

गोव्यात 13 फेब्रुवारीला राजधानी पणजीत होणाऱ्या कार्निवल मिरवणुकीसाठी पणजी महानगरपालिकेकडून दहा हजार मास्कचे वितरण मोफत करण्यात येईल.

पणजी: गोव्यात 13 फेब्रुवारीला राजधानी पणजीत होणाऱ्या कार्निवल मिरवणुकीसाठी पणजी महानगरपालिकेकडून दहा हजार मास्कचे वितरण मोफत करण्यात येईल, अशी घोषणा महापौर उदय मडकईकर यांनी येथे केली. कोविड महामारीमुळे गोव्यात यंदा केवळ पणजी व मडगाव शहरांमध्ये कार्निवल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आज महापौर आणि कार्निवल योजना संदर्भात स्थानिक आयोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, "कार्निवल आयोजनची पूर्ण तयारी झालेली आहे. यंदा शहरातून कार्निवल मिरवणूक जाणारआहे.  या निमित्ताने हजारो पर्यटक पणजी शहराला भेट देतील. याचा फायदा स्थानिक व्यवसायिकांना होणार आहे. कोविड काळात होणाऱ्या कार्निवल महोत्सवासाठी पुरेसे शारीरिक अंतर पाळून सर्वांनी सहभागी व्हावे. सर्वांना तसे करता यावे याची पुरेशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. आम्ही महापालिकेकडून दहा हजार मास्कचे वितरण उपस्थितांना करणार आहोत."

गोव्याचे मानांकन सुधारण्यासाठी बिझीनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन ची अंमलबजावणी -

संबंधित बातम्या