Goa: मडगावात ‘कासा मिनेझिस’ इमारतीचा भाग कोसळला

Goa: जीवितहानी नाही : इमारतीतील दुकाने, हॉटेल्‍स रिकामी करण्‍याचा आदेश
Goa: मडगावात ‘कासा मिनेझिस’ इमारतीचा भाग कोसळला
Goa: Buildings Parts Collapsed In Margaon.Dainik Gomantak

सासष्टी : मडगाव (Margaon, Goa) गांधी मार्केटच्या (Gandhi Market) जवळ असलेली ‘कासा मिनेझिस’ (Casa Menazis) या पोर्तुगीजकालीन इमारतीचा मागचा भाग कोसळण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या इमारतीचा भाग कोसळल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीमधील दुकाने तसेच हॉटेल रिकामी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्‍निशामक दल, पोलिस दाखल झाले.

प्राप्‍त माहितीनुसार, पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास कासा मिनेझिस या इमारतीचा मागचा भाग कोसळला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुकाने, उडपी हॉटेल व दुसऱ्या मजल्यावर निवासी गृह आहे. या दुर्घटनेत निवासी गृह व हॉटेलच्या किचनचा मागचा भाग कोसळला. निवासी गृह काही कारणास्तव बंद असल्याने व किचनमध्येही कुणीही नसल्याने जीवितहानी टाळली. इमारतीचा परिसर सध्या धोकादायक बनला असून, या इमारतीत कुणीही प्रवेश करू नये, यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Goa: Buildings Parts Collapsed In Margaon.
Goa: काणकोणात डेंग्यू आणि मलेरिया पसरण्याची भीती

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्‍निशामक दलाचे उपसंचालक नितीन रायकर, सासष्टी तालुक्याचे मामलेदार प्रताप गावकर यांनीही याठिकाणी येऊन पाहणी केली. या इमारतीच्‍या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या दुर्घटनेमुळे सध्या ही इमारत धोकादायक बनलेली असून, त्‍यातील दुकाने व हॉटेल रिकामी करण्याचा आदेश पालिकेने दिला आहे. इमारतीचा भाग कोसळलेल्या जागेत जलवाहिनी होती. यावर इमारतीचा भाग कोसळल्याने जलवाहिनी फुटली होती, त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली.

इमारतीचा मागचा भाग कोसळल्याने या इमारतीत प्रवेश करणे धोक्याचे आहे. या इमारतीत प्रवेश करण्यास बंदी घालण्याची सूचना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांनी दिली. ही इमारत त्वरित खाली करून यात चालणारी दुकाने व व्यवसाय बंद करणे, कोसळलेला भाग हटविण्याचा तसेच धोकादायक असलेला भागही हटविण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे.

धोकादायक यादीत समावेश नव्‍हता

२०१४ साली मडगाव पालिकेने मडगावात असलेल्या धोकादायक इमारतींची यादी जारी केली होती. या यादीत कासा मिनेझिस इमारतीचा समावेश नव्‍हता. यात टी. बी. कुन्हा स्कूल, पॉप्युलर प्राथमिक विद्यालय, क्रुझ मेन्सन, सिने लताजवळील सुकडो इमारत, गोल्डन फोटो स्टुडियो इमारत, संस्कार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग, गॅलक्सी अपार्टमेंट, ग्रेसिएस फुर्तादो इमारत, पेद्रो कार्दोझ इमारत, विल्हा कुतिन्हो इमारत, होली स्पिरिट चर्च जवळील कुलासो निवासस्थान, रेल्वे गॅटजवळील लोटलीकर इमारत, चिंचाल येथील परिश्रम रायकर, लाडू रायकर यांची इमारत, तिळवे इमारतींचा समावेश आहे.

Goa: Buildings Parts Collapsed In Margaon.
Goa: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; रेवल्युशनरी गोवन्सने केली मागणी

Related Stories

No stories found.