गोव्यात काजू फेणीच्या उत्पादनात झाली घट...

व्यावसायिकांची धडपड: गत माडाच्या फेणीसारखी
Goa cashew feni
production declines
Goa cashew feni production declinesDainik Gomantak

मडगाव: एकेकाळी गोव्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली माडाची फेणी आज माडाची संख्या घटल्याने आणि सूर (माडाचा निरा) काढण्यासाठी माणसे उपलब्ध नसल्याने जवळपास अज्ञातवासात गेली आहे. गोव्याचे ‘हेरिटेज ड्रिंक’ म्हणून मान्यता मिळालेल्या काजू फेणीचीही वाटचाल त्याच दिशेने तर सुरू नाही ना, अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. मागच्या तीन वर्षांत हे उत्पादन कमालीचे घटले आहे.

काजूचे (फळांचे) उत्पादन कमी झाल्यामुळेच फेणीचे उत्पादनही कमी झाले आहे. यावेळी वाईट हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे काजूची फळे निम्म्याने कमी झाली. साहजिकच फेणी उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Goa cashew feni
production declines
खरी कुजबुज: गोव्यात आयआयटी होणार तरी कुठे?

2020 पासून काजूचे उत्पादन कमी होत चालले आहे. त्‍यावर्षी लॉकडाऊनमुळे काजू तोडणे शक्य झाले नव्हते. 2021 सालीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा या पिकाला फटका बसला. यंदा कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असली तरी यावेळी पिकाला खराब हवामानाचा फटका बसला आहे.

‘काजूलो प्रीमियम फेणी’ या गोव्यातील प्रसिद्ध फेणीचे उत्पादक आणि फेणी उत्पादक संघटनेचे सचिव हेंझल वाझ म्हणाले की, कृषी खाते आणि कृषी संशोधन केंद्र या दोघांनी एकत्र येऊन यावर उपाय काढण्याची गरज आहे. शेतकरी जास्तीत जास्त काजूचे उत्पादन कसे घेतील यावर त्यांनी भर दिला पाहिजे.

Goa cashew feni
production declines
गोव्यातील 'कन्नड' समाजाच्‍या घाेषणेमुळे नवा वाद

‘हुर्राक’मुळेही फेणीवर परिणाम

‘हुर्राक’ काढण्याचे प्रमाण वाढल्यानेही काजू फेणीच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. यावरही काही प्रमाणात निर्बंध यायला हवेत. अन्यथा काजू फेणीचे उत्पादन वाढणे शक्य होणार नाही, असे वाझ यांनी सांगितले. सरकारने यासंबंधी ठोस धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

काजू फेणी टिकवून ठेवायची असल्यास भरपूर काजूची बोंडे उपलब्ध व्हायला हवीत. त्यासाठी जास्तीत जास्त जागा या लागवडीखाली आणण्याचे धोरण सरकारने आखले पाहिजे. शिवाय झाडाला जास्त रसाची फळे लागतील अशी जात कृषी संशोधन केंद्राने विकसित करणे गरजेचे आहे.

- हेंझल वाझ, फेणी उत्पादक संघटनेचे सचिव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com