Goa Cashew Feni : विमानतळांवर मिळणार ड्युटी-फ्री 'गोव्याची फेणी'; प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

हल्लीच सरकारने राज्यातील फेणी या मद्याला ‘जीआय’चा दर्जा दिला आहे
Goa Cashew Feni And Goa CM
Goa Cashew Feni And Goa CMDainik Gomantak

Goa Cashew Feni : गोवा, मुंबई, दिल्ली आणि इतर महानगरांच्या विमानतळावरील ड्युटी-फ्री दुकानांमध्ये गोवा फेणीच्या विक्रीच्या प्रस्तावाचा विचार केला जात आहे अशी माहिती विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. हल्लीच गोवा सरकारने राज्यातील फेणी या मद्याला ‘जीआय’चा दर्जा देऊन त्यासंदर्भात गोवा फेणी धोरण 2021ची अधिसूचनाही जारी केली होती.

Goa Cashew Feni And Goa CM
Goa Assembly Session Live : विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी वाचला प्रलंबित योजनांचा पाढा

काजू फेणी उद्योगाचा फायदा ग्रामीण व सामान्य शेतकऱ्यांना तसेच गावातील लोकांना होणार आहे. यापूर्वी त्यांना या उत्पादनासाठी सरकारकडून कोणतेच अनुदान तसेच आर्थिक साहाय्य मिळत नव्हते. सरकारच्या या धोरणामुळे काजू फेणी तयार करणाऱ्यांना सक्षम होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

फेणी म्हणजे आंबवलेल्या काजूपासून तयार केलेली दारू. गोव्यात काजू लागवडीत वाढ झाल्यानंतर काजूपासून फेणी बनवण्यामध्येही वाढ झाली. स्थानिकांनाही फेणीची चव आवडली आणि तिने हळूहळू इतर मद्यांची जागा घेतली. संस्कृतमधल्या ‘फेना’ शब्दावरून ‘फेणी’ हा शब्द प्रचलित झाला. फेना म्हणजे फेस. काजूची दारू बाटलीतून ग्लासात ओतल्यावर फेस येतो. त्‍यामुळे तिला ‘काजू फेणी’ नाव पडले असे सांगितले जाते.

Goa Cashew Feni And Goa CM
Land Grab Case: अखेर जमिन हडप प्रकरणाची उद्यापासून आयोगासमोर सुनावणी...

फेणी तयार करण्याची पद्धत क्लिष्ट आहे. पूर्वी काजू तोडल्यावर त्यातले बी काढले जायचे आणि आणि नंतर एका सगळी फळे कुटून त्यातील रस काढला जायचा. अलीकडच्‍या काळात हे काम यंत्राच्‍या साहाय्‍याने केले जाते. हा रस ‘निरो’ नावाने ओळखला जातो. नंतर हा निरो कोडेम नावाच्या मोठ्या मडक्यात आंबवण्यासाठी ठेवला जातो. तीन-चार दिवसांनंतर या रसावरील फेस दिसायचा बंद झाल्यास तो आंबल्याचे मानले जाते. पुढच्या टप्प्यात डिस्टिलेशन प्रक्रियेने शुद्ध फेणी काढली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com