Kargil Diwas In Goa: गोव्यात कारगिल दिवस उत्साहात, पहा खास फोटो

DGP Jaspal Singh
DGP Jaspal Singh Dainik Gomantak
Published on
DGP Jaspal Singh
DGP Jaspal Singh Dainik Gomantak

भारत, पाकिस्तान कारगिल युद्धात (India Pakistan Kargil War) प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिक आणि युद्ध विजयाच्या स्मरणार्थ, दरवर्षी 26 जुलै हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 'ऑपरेशन विजय'च्या (Operation Vijay) यशाचे प्रतीक मानला जातो. भारत मातेचे रक्षण करताना 500 हून अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले. गोव्यात आज ठिकठिकाणी कारगिल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. (Goa Celebrates Kargil Diwas)

Mayor Rohit Monserrate
Mayor Rohit MonserrateDainik Gomantak

पोलीस महासंचालक जसपाल सिंह (DGP Jaspal Singh) आणि पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरेत (Mayor Rohit Monserrate) यांनी आझाद मैदानातील शहिद स्तंभाला पुष्पहार अर्पण करून कारगिल शहिदांना आदरांजली वाहिली.

NCC Cadet
NCC Cadet Dainik Gomantak

यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांनी फेरी काढू देशभक्तीपर घोषणा दिल्या.

DGP Jaspal Singh
Public Holiday: पंचायत मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

कारगिल युद्धात सहभागी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कारगिल युद्ध 3 मे रोजी सुरू झाले असले तरी या दिवशी दहशतवाद्यांनी घुसखोरी सुरू केली होती. 26 जुलै रोजी युद्ध संपले. अशा प्रकारे दोन्ही देश एकूण 85 दिवस समोरासमोर राहिले. भारत आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष युद्ध 60 दिवस चालले, ज्याला 'ऑपरेशन विजय' (Operation Vijay) म्हणून ओळखले जाते. मातृभूमीचे रक्षण करताना 500 हून अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले. त्याच वेळी, युद्धादरम्यान 3,000 हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले. (Three thousand pakistani soldiers and terrorists killed)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com