गोव्यात दरवर्षीप्रमाणे नरकासूरदहन उत्साहात साजरे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

व्यात नरक चतुर्दशी ही उर्वरित भारतापेक्षा एक अनोख्या परंपरेने साजरी केली जाते. गोव्यात आजच्या दिवशी ठिक-ठिकाणी नरकासूराचे दहन केले जाते. त्यामुळे गोव्यात हा दिवस नरकासुर चतुर्दशी म्ह्णून ओळखला जातो. यावर्षीदेखील  काल दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यात नारकसुरांच्या प्रतिमा ठिकठिकाणी उभारल्या गेल्या होत्या.

पणजी :  गोव्यात नरक चतुर्दशी ही उर्वरित भारतापेक्षा एक अनोख्या परंपरेने साजरी केली जाते. गोव्यात आजच्या दिवशी ठिक-ठिकाणी नरकासूराचे दहन केले जाते. त्यामुळे गोव्यात हा दिवस नरकासुर चतुर्दशी म्ह्णून ओळखला जातो. यावर्षीदेखील  काल दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोव्यात नारकसुरांच्या प्रतिमा ठिकठिकाणी उभारल्या गेल्या होत्या. ही धामधूम मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. हे नरकासुर पाहण्यासाठी लहान मुलांपासून मोठी माणसेदेखील गर्दी करतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे कमी गर्दी पहावयास मिळाली.

मध्यरात्रीपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी होती, त्यामुळे ८ वाजल्यापासूनच नरकासुर गल्लोगल्लीत उभे करून ठेवण्यात आले होते. गोव्यातील देशी व विदेशी पर्यटकांना या नरकासुर प्रतिमा म्हणजे नावीन्य वाटते. किनारपट्टी भागात अनेक बार व रेस्टॉरंट सुरू असतात.
यावर्षी रात्रभर रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये म्ह्णून ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे, एरव्ही तरी नऊ वाजल्यानंतर शांत असलेली शहरे आज रात्रभर जागोजागी सुरू असलेल्या संगीतामुळे गजबजू लागली होती.

यासाठी दिवसासाठी नरकासुराचा पुतळा बनविण्याचे काम काही दिवस आधीच सुरू होते. नरकासुराचे दहन करण्यापूर्वी गावातून त्याची मिरवणूक काढली जाते. नरकासुर दहनानिमित्ताने अनेक स्पर्धांचे आयोजन देखील केले जाते.

या परंपरेमागील पौराणिक कथा अशी आहे की गोवा आणि कोकणातील गोमंतक भागात काही काळ नरकसूर या राक्षसी राजाने राज्य केले होते, ज्याचा कृष्णाने क्रौर्यकृत्यांमुळे शिरच्छेद केला. नरकासुराच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करून कृष्णाचा हा विजय गोव्यातील लोक साजरा करतात.

यादिवशी पुतळ्याच्या उत्कृष्ट प्रतिमेसाठी विविध संस्था स्पर्धा घेतात. बर्‍याच ठिकाणी तरुण कृष्णाची भूमिका करतात आणि नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करतात. हा उत्सव देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. यावर्षीदेखील उत्साहाने नरकासूरांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. राजधानी पणजीत पहाटे सहानंतर नरकासूराच्या प्रतिमांचे  फटाक्यांची आतषबाजी करीत दहन केले.

संबंधित बातम्या