Goa: कोकणी भाषा मंडळाचा 59वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे (modern technology)कोकणीचा विकास करण्यास प्राधान्य.हा संपुर्ण कार्यक्रम युट्युब व फेसबुक माध्यमातुन थेट प्रक्षेपित करण्यात आला.
कोकणी भाषा मंडळाच्या हिरक महोत्सवी बोध चिन्हाचे अनावरण केल्यावर मान्यवर.
कोकणी भाषा मंडळाच्या हिरक महोत्सवी बोध चिन्हाचे अनावरण केल्यावर मान्यवर.Dainik Gomantak

फातोर्डा: कोकणी भाषा (Konkani language)मंडळाने 59वा वर्धापनदिन 30 सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा केला. मंडळ हिरक महोत्सवी (Diamond Jubilee)वर्षात प्रवेश करते ही अभिमानाची गोष्ट असुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोकणी भाषेचा विकास करण्यास आपण प्राधान्य देत असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यानी

त्याचप्रमाणे विधायक कार्याद्वारे कोकणीचे कार्य पुढे नेण्यास आपण कटीबद्ध असल्याचेही सिंगबाळ यानी सांगितले. कोकणी भाषेमुळेच गोव्याला (Goa)घटक राज्याचा दर्जा मिळाला. त्याचसाठी सरकारने कोकणी भाषेचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. सरकारच्या घोषणा, विविध उपक्रम व योजनांचा मसुदा कोकणी भाषेतुन असावा असेही सिंगबाळ यानी सांगितले. जर सरकारला कोकणी साहित्चाचा प्रसार  सर्व तालुक्यांमध्ये करायचा असेल तर त्यास सहकार्य देण्यासाठी कोकणी भाषा मंडळ तत्पर असेल असेही सिंगबाळ म्हणाल्या.

कोकणी भाषा मंडळाच्या हिरक महोत्सवी बोध चिन्हाचे अनावरण केल्यावर मान्यवर.
फातोर्डा फाॅरवर्डचे उमेदवार आघाडीवर; पहिल्या चार प्रभागातील चारही उमेदवार विजयी

कोकणी भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक (Literary)देविदास कदम हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कोकणी कार्यकर्ता अॅंथनी व्हाज हे सन्माननिय अतिथी म्हणुन उपस्थित होते. व्यासपिठावर उपाध्यक्ष पोब्र फर्नांडिस, सचिव उल्हास गावकर, खजिनदार राजेश प्रभु उपस्थित होते.

भाषा, संस्कृती व साहित्य मानवी जिवनाची तीन प्रमुख अंगे: देविदास कदम

या तिन्ही अंगामुळे माणुस विचार करु शकतो. कल्पनाशक्तीत वाढ होते असे कदम यानी पुढे सांगितले. कोकणी भाषेत सर्व प्रकारचे शब्द आहेत त्यामुळे बोलताना किंवा लिहताना मध्ये मध्ये इतर भाषांतील शब्दांचा वापर करु नये. त्यामुळे कोकणी भाषेतील शब्द नष्ट होतील असेही कदम यानी सांगितले.

कोकणी भाषा मंडळाच्या हिरक महोत्सवी बोध चिन्हाचे अनावरण केल्यावर मान्यवर.
Goa Politics: फातोर्डा मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार

कोकणी भाषेतील शब्द नष्ट होत आहेत:

या प्रसंगी कोकणी भाषा मंडळाचे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली व विजेत्यांची ओळख करुन त्यांचे मनोगत ऑनलाईन(Online) माध्यमातुन प्रस्तुत करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये सखाराम बोरकर, पांडुरंग नाडकर्णी, महेश दिवेकर फा. जेसन बार्रेटो, स्व. श्रीधर कामत, वामन टाकेकर, अनंत अग्नी, शिरीष पै, फा.किरियेल डिसोझा, सुरेश पै यांचा समावेश आहे. करोना महामारीची गंभीर परिस्थिती सुधारल्यावर त्यांना हे पुरस्कार प्रत्यक्ष वितरीत केले जाईल.

या प्रसंगी हिरक महोत्सवी बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आले. सुरुवातीला समिक्षा पै धुंगट यानी कोकणी भाषा मंडळाच्या कार्याचा, उपक्रमांचा अहवाल सादर केला. या प्रसंगी आनंद पैंगीणकर, पल्लवी गोविंद पोळेकर, तानाजी पाटील, जर्सन ग्रासियस, या शिक्षकांना पुस्तके भेट देण्यात आली. रिया बेंगलोरकर याने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या प्रसंगी कोकणी विद्याभुवन प्राथमिक शाळा व रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिराच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओद्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले.

हा संपुर्ण कार्यक्रम यु ट्युब व फेसबुक माध्यमातुन थेट प्रक्षेपित करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com