Goa: वेळगे शैक्षणिक संस्थेत भाऊसाहेबांची पुण्यतिथी साजरी

भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन (Goa)
Goa: वेळगे शैक्षणिक संस्थेत भाऊसाहेबांची पुण्यतिथी साजरी
Celebration of Bhausaheb's death anniversary at Velge Educational Institution, GoaTukaram Sawant / Dainik Gomantak

Bicholim: वेळगे (Velge) येथील बाळकृष्ण बांदोडकर शैक्षणिक संस्थेत गोव्याचे भाग्यविधाते आणि मुक्त गोमंतकाचे पहिले मुख्यमंत्री स्व.भाऊसाहेब बांदोडकर (Goa's 1st CM Bhausaheb Bandodkar) यांची पुण्यतिथी (Death Anniversary) विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वेळगे पंचायतीची उपसरपंच उन्नती सहस्त्रबुद्धे उपस्थित होत्या. यावेळी सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल वेर्णेकर, श्रीमती माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला परब, भारती बांदोडकर प्राथमिक विद्यालयाच्या प्रभारी भारती हळदणकर, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सब्रीना आदी उपस्थित होते. (Goa)

Celebration of Bhausaheb's death anniversary at Velge Educational Institution, Goa
Goa: मुरगाव तालुक्यात बांदोडकरांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली...

भाऊसाहेबांची पुण्यतिथी केवळ स्मरण करण्यापूर्तीच मर्यादित न ठेवता, त्यांनी गोव्याच्या शैक्षणिक क्रांतीसह विकासासाठी दिलेले योगदान देखील स्मरणात ठेवण्याची गरज आहे. ज्ञान आणि शिक्षणाने समृद्ध होऊन भाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. असे आवाहन उन्नती सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी विवान यशवंत घाडी, वैभवी विलास गवस, आसमा मुजावर यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. अन्नपूर्णा जोग यांनी सूत्रसंचालन तर संजय नाईक यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.