Goa: डिचोली लायन्स क्लबतर्फे सफाई कामगारांना चतुर्थीची भेट

62 सफाई कर्मचाऱ्यांना लायन्सतर्फे कडधान्याचे वितरण (Goa)
Goa: डिचोली लायन्स क्लबतर्फे सफाई कामगारांना चतुर्थीची भेट
डिचोली लायन्स क्लबतर्फे पालिकेच्या 62 सफाई कर्मचाऱ्यांना कडधान्याचे वितरण (Goa )Dainik Gomantak

Goa: डिचोली पालिकेच्या (Bicholim Municipality) सफाई कामगारांना (Sweepers) लायन्स क्लबतर्फे चतुर्थीची भेट देण्यात आली आहे. शहर स्वच्छ राखण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या जवळपास 62 सफाई कामगारांना लायन्सतर्फे कडधान्य वितरीत करण्यात आले आहे. पालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी (Bicholim Mayor Kundan Falari) आणि लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना कडधान्य वितरीत करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष शैलेश बुर्ये, राजेश कारापूरकर, गुरूदास कडकडे, सेझा (वेदांता) कंपनीचे अधिकारी श्री. खर्बे आणि नगरसेवक विजयकुमार नाटेकर उपस्थित होते.

डिचोली लायन्स क्लबतर्फे पालिकेच्या 62 सफाई कर्मचाऱ्यांना कडधान्याचे वितरण (Goa )
Goa: 'शिवोलीच्या विकासाचा पाया कॉंग्रेसच्या काळात घातला गेला'

सफाई कामगार म्हणजे पालिकेचा कणा आहे. त्यांच्यामुळेच शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होते. त्यांच्या कार्याला तोड नाही. सफाई कामगार हे खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. अशा शब्दात नगराध्यक्ष फळारी यांनी सफाई कामगारांचे कौतुक केले. विजयकुमार नाटेकर, गुरूदास कडकडे यांनीही सफाई कामगारांच्या कार्याची स्तुती केली. राजेश कारपूरकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेश बुर्ये यांनी कामगारांना कडधान्य देण्यामागचा हेतू सांगितला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com