गोवा बुद्धिबळ संघटनेची निवडणूक 30 जुलैला

chess Association Goa.jpg
chess Association Goa.jpg

पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक येत्या 30 जुलैला होणार आहे. त्यापूर्वी तालुका बुद्धिबळ संघटनांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत राज्य संघटनेशी संलग्न एकूण बारापैकी नऊ तालुक्यातील कार्यकारिणी बिनविरोध ठरल्याची माहिती राज्य संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी सोमवारी दिली. तालुका संघटनेचा प्रतिनिधी राज्य संघटनेच्या निवडणुकीस पात्र असेल. (Goa Chess Association elections are on July 30)

केपे व धारबांदोडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी राजकारणी असून दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते प्रमुखपदी आहेत. वीजमंत्री नीलेश काब्राल सध्या गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत, केपे तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांची धारबांदोडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार, आणखी एका मुदतीसाठी काब्राल राज्य संघटनेचे बिनविरोध अध्यक्ष बनू शकतात.

तीन ठिकाणी जोरदार चुरस

प्राप्त माहितीनुसार, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सध्याचे उपाध्यक्ष आशेष केणी, महेश कांदोळकर, वसंत नाईक यांना तालुका पातळीवर जोरदार प्रतिकार अपेक्षित आहे. त्यांना तालुका अध्यक्षपदासाठी अनुक्रमे दिगंबर सावळ (सासष्टी), संदेश चोडणेकर (तिसवाडी) व प्रभाकर शेट्ये (पेडणे) यांचे प्रबळ आव्हान आहे. या तिन्ही तालुका संघटनेची निवडणूक प्रक्रिया येत्या रविवारी (ता. 27) पूर्ण होईल.

बिनविरोध तालुका संघटनेचे अध्यक्ष व सचिव

  • - केपे:  नीलेश काब्राल व समीर नाईक
  • - धारबांदोडा: विनय तेंडुलकर व अनिल गावकर
  • - मुरगाव:  किशोर बांदेकर व मुकुंद कांबळी
  • - काणकोण: शरेंद्र नाईक व डॉ. अमन प्रभुगावकर
  • - सांगे:  किशोर गावस देसाई व प्रेषित सावंत देसाई
  • - फोंडा: सागर साकोर्डेकर व अमोघ नमशीकर
  • - बार्देश: विश्वास पिळर्णकर व प्रवीण बर्डे
  • - डिचोली: राजन कडकडे व सत्यवान हरमलकर
  • - सत्तरी: कालिदास हरवळकर व गिरीश गाडगीळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com