"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरविकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

डॉ. प्रमोद सावंत व नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

मडगाव : प्रभाग राखीवतेच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्यातून भाजप सरकार बेकायदेशीरपणे व घटनाविरोधी पद्धतीने काम करत असल्याचे सिद्ध झाले असून या निवाड्यामुळे उघडे पडलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. प्रभाग राखीवतेत घोळ केलेले पालिका प्रशासन खात्याच्या संचालकांना पदावरून निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

मी पुन्हा येणार! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं अप्रत्यक्ष प्रतिपादन

यावेळी गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो, दक्षिण गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश उपाध्यक्ष आल्तिन गोम्स उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोग चोखा राम गर्ग यांचा सरकारने वापर केला व गर्ग यांनी सरकारकडून आलेल्या बेकायदशीर सूचना अव्हेरल्या नसल्याने या बेकायदेशीर कृत्यात त्यांचाही सहभाग स्पष्ट झाला आहे. गर्ग यांना या पदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी चोडणकर यांनी केली. आपण न्यायपालिकेच्या वर आहोत. न्यायपालिकेला आपण आपल्यास हवी तशी वापरू शकतो अशी गुर्मी भाजपला होती. पण, या निवाड्याने भाजपला चपराक मिळाली आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

शिवजयंती मिरवणूक कळंगुटपर्यंत नेणारच; गोव्यातील शिवप्रेमींचा निर्धार

संबंधित बातम्या