मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद केंद्राचे उद्घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगाव रवींद्र भवन येथे स्वामी विवेकानंदाच्या 158  जन्मशताब्दी निमित्त युवा संमेलनात वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात उल्लेखीय काम केलेल्या युवकांचा या वेळी सत्कार केला.

मडगाव : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगाव रवींद्र भवन येथे स्वामी विवेकानंदाच्या 158व्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या युवा संमेलनात वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात उल्लेखीय काम करणाऱ्या युवकांचा सत्कार केला.

‘आप’चा स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना पाठिंबा

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री बाबू अझगावकर, दामू नाईक, प्रसन्न आचार्य व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगाव रवींद्र भवन येथे स्वामी विवेकानंद केंद्राचे उद्घाटनदेखील केले.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा

याआधी 18 जानेवारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे ‘दामोदर साल’ ला भेट दिली होती. या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गोवा दौऱ्यादरम्यान काहीकाळ वास्तव्य केले होते. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री येथे भेट देणार होते मात्र केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्यानंतर त्यांनी हा दौरा पुढे ढकलला होता.

 

 

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या