शिवजयंती : "छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पिढ्यान् पिढ्या सगळ्यांना प्रेरणा देत राहिल"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शिवजयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देत, शिवरायांना अभिवादन केलं.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शिवजयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देत, शिवरायांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फर्मागुडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी, "छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि धैर्य हे पिढ्यान् पिढ्या सगळ्यांना प्रेरणा देत राहिल", असं ते म्हणाले. गोव्यात मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महारांजांची जयंती साजरी केली जाते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात शिवजयंती साजरी होत. राज्यातील कोरोनाची स्थिती बघता सरकारकडून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात देखील अत्यंत उत्साहाच्या वातावरणात शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवजन्मोत्सवाचा शासकिय सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, काही निवडक लोकांनाच या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. 

संबंधित बातम्या