Goa: मुख्यमंत्र्यांचा उद्या शिरोडा मतदारसंघ दौरा

Goa: डॉ. प्रमोद सावंत बोरी, शिरोडा, पंचवाडी आणि बेतोडा-निरंकाल या गावांना भेट देणार आहेत
Goa: मुख्यमंत्र्यांचा उद्या शिरोडा मतदारसंघ दौरा
Goa: Dr. Pramod SawantDainik Gomantak

बोरी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांचा शनिवार, दि. ४ रोजी शिरोडा मतदारसंघात दौरा आहे. मुख्यमंत्री दिवसभर मतदारसंघातील बोरी, शिरोडा, पंचवाडी आणि बेतोडा-निरंकाल या गावांना भेट देणार आहेत. त्यांच्या आगमनाची पूर्वतयारी करण्यासाठी देऊळवाडा-बोरी येथील राघवेंद्र स्वामी सभागृहात शिरोडा भाजप मंडळाची सभा घेण्यात आली. आमदार सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, शिरोडा भाजप मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक, मीनानाथ उपाध्ये, भाजप महिला मोर्चाच्या परिमल सामंत, फिलोमिना वाज, पंचायत सदस्य सुनील सावकर, मनुराय नाईक, दुमिंग वाज आदी मान्यवर यावेळी उपस्‍थित होते.

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. सावंत मतदारसंघाला भेट देणार असल्याने गावागावांत भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या दिवशी सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांचे टॉपकोला-बोरी येथे आगमन झाल्यावर त्‍यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर बाजार शिरोडा येथे महिलांच्या ‘बाजार डे’चे उद्‍घाटन, पेडे-शिरोडा येथे श्रीकृष्ण मंदिर मंडपाचे उद्‍घाटन त्यानंतर आवेडे-बोरी साईबाबा मंदिराकडे सभा, पाणीवाडा-बोरी येथे तसेच मॅकडोनल-बेतोडा येथे जलवाहिनीचे उद्‍घाटन, दुपारी ३.३० वाजता पंचवाडी दिगास येथील शाळा इमारतीचे उद्‍घाटन, पंचायत सभागृहात सभा, जितोणेमाण-पंचवाडी रस्ता संरक्षक भिंतीचे लोकार्पण त्यानंतर बाजार शिरोडा येथे सभा होणार आहे, असे यावेळी सांगण्‍यात आले. यावेळी सुभाष शिरोडकर, दीपक नाईक बोरकर, परिमल सावंत, सुनील सावकर, मीनानाथ उपाध्ये आदींनी विचार मांडले. सूरज नाईक यांनी स्वागत केले.

Goa: Dr. Pramod Sawant
Goa Election: निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी प्रफुल्ल पटेल गोव्यात

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com