मेजर पोर्ट विधेयकामुळे उगारला गोव्यावर मृत्यूचा बडगा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी गोव्याची विक्री केली, असा आरोप आम आदमी पक्षाने आज केला. मेजर पोर्ट विधेयकामुळे गोव्यावर मृत्यूचा बडगा उगारला आहे,

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी गोव्याची विक्री केली, असा आरोप आम आदमी पक्षाने आज केला. मेजर पोर्ट विधेयकामुळे गोव्यावर मृत्यूचा बडगा उगारला आहे, असे आपचे राज्य संयोजक राहूल म्हांबरे यांनी नमूद केले. मुरगाव पोर्ट ट्रस्ट आता “राज्यातील एक राज्य” असेल कारण आता दक्षिणेकडील बेतूल ते उत्तरेकडील काबो राजभवनापर्यंतच्या गोवन भूमीच्या एक तृतीयांश क्षेत्रावर त्यांचा अधिकार असेल. गोव्यातील तिन्ही खासदारांनी या विधेयकावर आक्षेप न घेतल्यामुळे गोव्याच्या हिताशी प्रतारणा केल्याचा आरोप म्हांबरे यांनी केला. "गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेथे हे विधेयक मंजूर झाले तेव्हा लोकसभेचे खासदार गप्प होते आणि काल राज्यसभेचे खासदारही गप्प होते," असे राहूल म्हांबरे  म्हणाले.

पंचायत आणि नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा एमपीटीकडे आता अखंडित अधिकार असतील, असा इशारा त्यांनी दिला. सर्वात वाईट बाब म्हणजे गोव्यातील मत्स्यव्यवसाय समुदायाचा नाश होईल, कारण त्यांची घरेही आता एमपीटीच्या अखत्यारीत येतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

गोवा वीजग्राहक धारकांना खात्याच्या तांत्रिक चुकीचा फटका -

 

...अन्यथा वास्को शहरातला कचरा मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर फेकू -

संबंधित बातम्या