पर्वरी नागरिकांना मार्चअखेरीस मिळेल 15 एमएलडी पाणी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मार्च अखेरपर्यंत पर्वरी भागात पाणी सोडण्यास आश्वासन नागरिकांना दिले आहे.

पर्वरी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मार्च अखेरपर्यंत पर्वरी भागात 15 एमएलडी पाणी सोडण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले की, "पर्वरी येथील 15 एमएलडी पाणी प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प अंशतः सुरू करण्याबाबत पीडब्ल्यूडीला निर्देश देण्यात येतील." लेखा भवन संचालनालयाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी केल्यानंतर पर्वरी चे आमदार रोहन खौंटे यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला उत्तर देताना प्रमोद सावंत बोलत होते. 

"पर्वरीमध्ये सध्या सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्पही लवकरच पूर्ण होतील सरकारला कल्पना आहे की नवीन संकुले जोडल्यामुळे वीज आणि पाणी यासारख्या पायाभूत सुविधांवर भार आला आहे आणि त्यामुळे नागिकांना अडचणी ला सामोरे जावे लाागले आहे. जनतेला त्रास होऊ नये यासाठी पर्वरीमध्ये नवीन प्रकल्पांची स्थापना करण्यापूर्वी या मूलभूत आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश मी जीएसआयडीसीला दिले आहेत. यापूर्वी पर्वरीच्या आमदारानी पर्वरी येथे लेखा भवन प्रकल्प उभारल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता,"असेही  मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

गोवा सरकारच अडकले चक्रव्‍युहात -

“प्रत्येक नवीन प्रकल्पात पाणी, वीज, कचरा आणि सांडपाणी यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा भार वाढत आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सरकारने पायाभूत सुविधांच्या गरजा विचारात घ्याव्यात," असे पर्वरी चे आमदार रोहन खौंटे म्हणाले. "पर्वरीमध्ये 21 एमएलडी पाण्याची गरज आहे  सध्या या भागात केवळ 13-16 एमएलडी क्षेत्र आहे, तेव्हा पर्वरीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे सरकरारने आता लक्ष द्यावे. नवीन मार्केट कॉम्प्लेक्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि फायर स्टेशन सारख्या अनेक प्रकल्पांमध्ये गोगलगायच्या गतीने प्रगती होत आहे. हे प्रकल्प तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे," असे मत पर्वरी चे आमदार रोहन खौंटे यांनी व्यक्त केले.

Delhi Tractor Parade Violence : योगेंद्र यादवांसह 20 शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस -

जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष आणि म्हापसाचे आमदार डिसोझा म्हणाले की, "पर्वरी आता शैक्षणिक आणि व्यावसायिक केंद्र बनले आहे. या नवीन लेखा भवन प्रकल्प आणि उच्च न्यायालय प्रकल्पामुळे पर्वरीचे महत्त्व वाढणार आहे. जीएसआयडीसी लेखा भवन प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही प्रयत्न करत आहे."

 

संबंधित बातम्या