केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना उपचारांसाठी तात्काळ दिल्लीला हलवण्याची शक्यता

Goa Chief Minister Pramod Sawant informed that the minister doesnt need to be shifted to Delhi for treatment as of now said Goa chief minister Dr Pramod Sawant
Goa Chief Minister Pramod Sawant informed that the minister doesnt need to be shifted to Delhi for treatment as of now said Goa chief minister Dr Pramod Sawant

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात असलेले संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील उपचारासाठी दिल्लीतून तज्ज्ञ डॉक्टर पाठवावे की त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवावे याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज गोव्यात येणार आहेत. ते आल्यानंतर याविषयीचा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

नाईक काल कर्नाटकातील अंकोलाजवळ झालेल्या अपघातात जबर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी विजया या अपघातात मृत्यूमुखी पडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की मध्यरात्री अडीच ते सकाळी सात या दरम्यान नाईक यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून शरीर उपचाराला प्रतिसाद देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com