मी पुन्हा येणार! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं अप्रत्यक्ष प्रतिपादन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार असून पुढील मुख्यमंत्रीही मीच असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान अप्रत्यक्षरीत्या केले.

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार असून पुढील मुख्यमंत्रीही मीच असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान अप्रत्यक्षरीत्या केले. कुजिरा बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या विस्तारित इमारतीचे उद्‍घाटन केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की दोन वर्षापूर्वी आपण सभापती असताना सामाजिक बांधिलकी अंतर्गत डॉ. हेडगेवार उ. मा. विद्यालयासाठी नवी इमारत बांधण्यासाठी आपण पुढाकार घेऊन पावर फायनान्स कार्पोरेशन ही कंपनी व शिक्षण संस्था यांच्यात करार केला होता. आज आपल्या हस्ते पूर्ण झालेल्या इमारतीचे उद्‍घाटन होत आहे. या इमारतीसाठी आणखी काही सुविधा देण्याचे पीएफसी कंपनीने आश्‍वासन दिले आहे. त्या सुविधांचे उद्‍घाटनही आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या पुढील कारकिर्दीत केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी  केले. 

गोव्यातील 37 आरोग्य केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम; पणजीत 100 ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण 

सरकारी वाहने इलेक्ट्रिक
राज्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार सौर ऊर्जेला प्राधान्य देत असून एनर्जी इफिसियन्सी सर्विसेस लिमिटेड यांच्या माध्यमातून राज्यात जास्त जास्त प्रकल्प सौर ऊर्जेवर व इलेक्ट्रिक चार्जींगचे व्हावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. येत्या वर्षभरात राज्य सरकारची बहुतांश वाहणे ही  इंधन विरहित व इलेक्ट्रिक करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज केले.

गोवा वन खात्याचा बेपत्ता वनरक्षक योगेश वेळीप महाराष्ट्रात सापडला 

संबंधित बातम्या