गोवा दौऱ्याआधी गृहमंत्री अमित शाहांचा 'होम वर्क'

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

आपल्या नियोजित दौऱ्यापूर्वी महिनाभर आधी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्याचे राजकारण, समाजकारण, आंदोलने, विकासकामे, प्रलंबित प्रश्न यांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  घेतली.

पणजी :  आपल्या नियोजित दौऱ्यापूर्वी महिनाभर आधी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्याचे राजकारण, समाजकारण, आंदोलने, विकासकामे, प्रलंबित प्रश्न यांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्यात याविषयी अहवाल सादर केला. मुख्यमंत्री आज गोव्यात परत येणार आहेत.

पश्चिम बंगालसोबत विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांच्या दौऱ्यावर शहा येणार आहेत. त्यात गोव्याचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली. मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान जिल्हा पंचायत निवडणुकीत ३३ जागा जिंकल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. खाणी सुरू करण्याबाबत केंद्रीय पातळीवर कोणते प्रयत्न होणे आवश्यक आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.

 

अधिक वाचा :

अभ्यासाला लागा..गोवा बोर्डाची बारावीची परीक्षा २६ एप्रिलपासून

गोव्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी, आंबा आणि काजू बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता

संबंधित बातम्या