मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी घेतली श्रीपाद नाईकांची भेट

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोमेकॉ इस्पितळात जाऊन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोमेकॉ इस्पितळात जाऊन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक हे कर्नाटक दौऱ्यावरून गोव्यात परतत असताना यल्लापूर-गोकर्ण रस्त्यावर होस्कुंबी येथे सायंकाळी सात वाजता त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. या अपघातात नाईक हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्या पत्नी विजया व त्‍यांच्‍यासोबत गाडीतून प्रवास करणारे डॉ. दीपक घुमे हे ठार झाले. वाहनाने रस्त्यालगतच्या उंचवट्याला धडक दिली व नंतर कार उलटली. या अपघातात अन्य चौघेजणही गंभीर जखमी झाले होते. जखमी नाईक यांना उपचारासाठी ‘गोमेकॉ’त हलवण्यात आले होते.

11 जानेवारी रोजी कर्नाटकातील येल्लापूरहून गोकर्ण येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता या अपघातात त्यांची पत्नी सौ. विजया नाईक यांचा आणि आणि कार मध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांचे पण निधन झाले आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्याचे समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सुरवातीला ‘गोमेकॉ’त गेले होते श्रीपादभाऊ यांच्‍या अपघाताविषयी राज्‍यात माहिती पसरताच अनेकांना धक्का बसला होता. संरक्षण राज्यमंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्याचे समजल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तातडीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. नाईक यांना उत्तमोत्तम उपचाराची व्यवस्था करावी व गरज भासल्यास दिल्लीला हलवावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली होती.

दिल्ली हिंसाचाराबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस -

संबंधित बातम्या