Goa: चिखली चौकात वाहतुकीला त्रास
चिखली चौकातील वाहतूक बेटाच्या सभोवती वाढलेली झुडपे.Dainik Gomantak

Goa: चिखली चौकात वाहतुकीला त्रास

या बेटाला लावण्यात आलेल्या रेडियमच्या पट्ट्या वाढलेल्या झुडपामुळे रात्रीच्या वेळी नजरेस पडत नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

दाबोळी: चिखली चौकातील वाहतूक बेटाच्या सभोवती झुडपे वाढल्याने वाहनचालकांना(Driver) यांचा त्रास होत आहे. यामध्ये दुचाकी वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून बेटाची लवकरात लवकर साफसफाई करावी, अशी मागणी नागरीकातून करण्यात येत आहे.

चिखली चौकात पूर्वी गोवा शिपयार्डने वाहतूक बेट उभारले होते. परंतु, त्यातील बांधकामामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसत नव्हती. त्याचा बऱ्याच तक्रारी आल्यानंतर तेथील ते बांधकाम हटविण्यात आले. त्यानंतर तेथे वाहतूक बेटाचा आकार लहान करून सुशुभीकरण (Embellishment)करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, काही कारणास्तव तेथील वाहतूक बेटाचे सुशुभीकरण होऊ शकले नाही.

चिखली चौकातील वाहतूक बेटाच्या सभोवती वाढलेली झुडपे.
Goa : ‘दाबोळी’च्या शहरीकरणाला समस्‍यांचा विळखा

यामुळे, सध्या तेथील अपूर्णावस्थेतील वाहतूक बेट दिसत आहे. या वाहतूक बेटाजवळून दिवसाकाठी हजारो वाहने ये-जा करतात. मात्र या बेटाच्या सभोवती झुडपे वाढल्याने वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. या बेटाला लावण्यात आलेल्या रेडियमच्या पट्ट्या (Radium strips)वाढलेल्या झुडपामुळे रात्रीच्या वेळी नजरेस पडत नसल्याने अनोळखी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com