Chorla Ghat: गोवा चोर्ला घाटात अवजड वाहनांप्रकरणी नवे आदेश जारी!

Goa News: पर्यायी व्यवस्था नसल्याने या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरुच आहे.
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak

Valpoi: गोवा-बेळगाव या चोर्ला घाटातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. परंतु पर्यायी व्यवस्था नसल्याने या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. वाहतूक खात्याने काही वाहने अडवली होती. मात्र, बेळगावातून येणारी भाजी व दुधाची वाहने रोखण्याचा इशारा चालकांनी दिला. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, चोर्ला घाटातून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुभा देण्यात आली आहे. वाहतूक खात्याने या वाहनांचे क्रमांक नोंद केले आहेत. ही वाहने पुन्हा राज्यात आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. सध्या अनमोड घाट बंद असल्यामुळे अवजड वाहतुकीला गोव्यात येण्यास समस्या निर्माण होत आहेत.

Chorla Ghat
Goa Mine: खाण अवलंबितांनो निदान आता तरी जागे व्हा! अन् सरकारला जाब विचारा

पोळे मार्गे बेळगावला जाण्यासाठी 160 किलोमीटरचे अतिरिक्त अंतर कापावे लागते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बेळगाववरून येणारी वाहने परत पाठवणे शक्य नसल्याने दोन हजार रुपयांचा दंड देऊन तसेच त्यांचा नंबर नोंद करून प्रवेश दिला जात आहे. तसेच वाहनचालकांना याच मार्गाने परत जाता येणार नाही, असे बजावले आहे.

वाहने वळवण्यात अडचणी

बेळगावहून गोव्यात येणारी वाहने परतवून लावणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण गोवा राज्याच्या हद्दीत वाहने वळवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मात्र, ही वाहने सुर्ला येथे कर्नाटक तपासणी नाक्यावर रोखणे शक्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणी गोवा पोलिसांची नेमणूक करावी आणि तेथेच वाहतूक रोखावी किंवा वाहने परत पाठवावीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Chorla Ghat
Goa Forward: BJP सरकारला आमदार फोडण्यातच रस; दिलेल्या आश्वासनांचे काय?

अनमोड रस्ता सुरळीत करा!

आता चोर्ला घाटात दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांना बंद घातल्याने गोव्यातील विविध व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चोर्ला आणि अनमोड हे दोन्ही मार्ग सरकारने लवकरात लवकर सुरळीत करून उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कर्नाटक सरकारनेच वाहने सोडू नयेत

खरे तर कर्नाटक सरकारने त्यांच्यात हद्दीत अवजड वाहतुकीवर बंदी घालायला हवी. पण कर्नाटक सरकार आपल्या हद्दीतून पुढे गाड्या सोडत असल्याने अवजड वाहने बिनधास्तपणे चोर्ला घाटात प्रवेश करतात. त्यामुळे त्यांना गोवा हद्दीवरच रोखून ठेवावे लागत आहे.

Chorla Ghat
Goa Petrol Price: सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, जाणून घ्या गोव्यातील दर

महागाई वाढण्याचा धोका

बेळगावहून मोठ्या प्रमाणात भाजीपाला, दुधाचा पुरवठा होत असल्याने गोव्यावर महागाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. कारण अनमोड रस्ता बंद असल्याने पोळे मार्गे बेळगावला जाण्यासाठी 160 किलोमीटरचे अतिरिक्त अंतर कापावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. साहजिकच महागाई वाढू शकते.

पोलिस गस्त हवीच

जिल्हाधिकाऱ्यांनी साखळी व होंडा भागातून ‘नो एन्ट्री’चा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. कारण ‘नो एन्ट्री’च्या जागी वाहतूक पोलिस नेमलेला नाही. या ठिकाणी वाहने अडवून ठेवल्यास केरी चेकपोस्टवर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही‌.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com