चर्चिल कन्येचा नावेलीतून प्रचार सुरू

राष्ट्रवादीचे गोव्यातील एकमेव आमदार असलेले चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमाव यांनी नावेलीतून आपल्या प्रचाराला सुरवात केली.
चर्चिल कन्येचा नावेलीतून प्रचार सुरू
Goa चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमावDainik Gomantak

मडगाव: राष्ट्रवादीचे गोव्यातील (Goa) एकमेव आमदार (MLA) असलेले चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमाव यांनी नावेलीतून आपल्या प्रचाराला सुरवात केली. मात्र ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढविणार की कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर हे मात्र त्यांनी उघड केले नाही.नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने ही जागा खाली झाली असून वालांका आलेमाव यांनी यापूर्वीच आपण नावेलीतून निवडणूक लढविणार हे जाहीर केले होते.

Goa चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमाव
करीयरला प्रोत्साहन देणारा 'गोमंत बाल भूषण पुरस्कार'

काल रविवारी डोंगरी नावेली येथे सभा घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यांच्या बरोबर त्यांचे वडील चर्चिल आलेमाव हजर होते. त्या कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार असे त्यांना विचारले असता, त्याचा निर्णय माझे वडील घेतील असे सांगितले.

यावेळी बोलताना वालांका आलेमाव यांनी, 2007 च्या निवडणूकीत नावेलीच्या लोकांनी आपले वडील चर्चिल आलेमाव याना भक्कम पाठिंबा दिला. त्यांनतर आलेमाव कुटुंबाचे नावेलीशी दृढ ऋणानुबंध जुळले असे सांगून नावेली मतदारसंघाशी आपले भावनिक नाते जुळले आहे. जसे तुम्ही माझ्या वडिलांना निवडून आणले तसेच आपल्यालाही निवडून आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Goa चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमाव
गोवा सुरक्षित,उच्चशिक्षित आणि निर्व्यसनी हवा

यावेळी बोलताना चर्चिल आलेमाव यांनी, ज्यावेळी आपण सेव्ह गोवा फ्रंट हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला त्यावेळी काँग्रेसने वालांकाला दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर त्याची पूर्तता होऊ शकली नाही असे ते म्हणाले. आपल्या मुलीला राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करायची आहे. त्यासाठीच ती निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहत आहे. आलेमाव कुटुंबाला नावेलीतील मतदारांनी नेहमीच प्रेम दिले आहे. आता आपल्या मुलीलाही तसेच प्रेम द्या असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

No stories found.