बंगळुरू बलात्कारप्रकरणातील संशयित गोवा सीआयडी क्राईम ब्रँचच्या ताब्यात

दैनिक गोमंतक
बुधवार, 6 जानेवारी 2021

गोव्याच्या सीआयडी क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी त्याला काणकोण पोलिसांच्या मदतीने काणकोण येथे अटक केली.

पणजी: बंगळुरू येथील बलात्कार व खूनप्रकरणी फरारी असलेला संशयित प्रणीवा याला गोव्याच्या सीआयडी क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी त्याला काणकोण पोलिसांच्या मदतीने काणकोण येथे अटक केली.

त्याला बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयित गुन्हा केल्यावर गोव्यात आश्रय घेत असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी गोवा पोलिसांना दिल्यावर तीन पोलिस पथके तैनात करण्यात आली. या पथकाने केलेल्या तपासात तो काणकोण येथे असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

आणखी वाचा:

‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम आता शहरांत -

संबंधित बातम्या