गोवा : इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा येत्या 24 एप्रिलपासूनच होणार 

10-12  th exam.jpg
10-12 th exam.jpg

देशभरात कोरोनाचा  कहर सुरू असल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरातील 10 वी आणि 12 च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक राज्यांनी देखील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र गोवा सरकारने या परीक्षा रद्द करणार नसल्याचे जाहीर केले होते. तथापि आता, गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा येत्या 24 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. दरम्यान, गोव्यातील विरोधी पक्षांनी शनिवार  24 एप्रिल पासून राज्य मंडळाच्या दहावी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत किंवा ऑनलाईन घेण्यात याव्यात,  अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत.  (Goa: Class 10th and 12th board exams will be held from April 24) 

राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेताना कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची परवानगी शिक्षण विभागाला देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या बुधवारी म्हणजे 14  एप्रिल रोजी सांगितले होते.  तथापि, आत्ता आम्ही कोणत्याही बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा विचार केलेला नाही. तसेच, विद्यार्थी जेव्हा  परीक्षेला जातील तेव्हा विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सामाजिक अंतरसह सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातील असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी  कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा भाग म्हणून आणि सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करण्यासाठी केवळ ११ विद्यार्थ्यांना एका परीक्षा सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 

दरम्यान गोवा शिक्षण विभागाने यापूर्वीच इतर सर्व वर्गांच्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायांचे पालन करून महामारीच्या पार्श्वभूमीवर गेलयावर्षी राज्यात महाविद्यालयीन परीक्षा यशस्वीरित्या घेण्यात आल्याचेही यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नमूद केले होते.  गोव्यात कोरोना संसर्गाच्यावाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना 9 व ११ वीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com