क्रीडा खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन

ही मोहीम आझादीका अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा भाग होता.
क्रीडा खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
क्रीडा खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले क्रिडापटू व शारिरीक शिक्षणाचे शिक्षक.Dainik Gomantak

फातोर्डा: गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या सासष्टी कचेरीतर्फे दोन दिवस स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले. ही मोहीम आझादीका अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा भाग होता. पहिल्या दिवशी 55 तर दुसऱ्या दिवशी 60 पेक्षा जास्त क्रिडापटू व शारिरीक शिक्षणाचे शिक्षकांनी या मोहिमेत भाग घेतला.  पहिल्या दिवशी  सकाळी 8 वाजता ही मोहिम रवीन्द्र भवन मडगाव परीसरातुन सुरु झाली.

क्रीडा  खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले क्रिडापटू व शारिरीक शिक्षणाचे शिक्षक.
गोव्याचा इतिहास भुमिपुत्रांपासुन सुरु व्हावा; प्रजल साखरदांडे

नंतर दामोदर लिंग, तळी, रोझरी हायस्कुल व नेहरु स्टेडियम या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय तायकवोंडे खेळाडू व जिवबादादा केरकर पुरस्कार विजेती आंजेला द आब्रेयु नाईक उपस्थित होती. दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिमेस आके पावरहाउस येथुन सुरुवात होऊन व दवर्ली मैदानावर संपली. या वेळी कुमरा झर परिसराची स्वच्छता करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिस अधिक्षक व माजी हॉकीपटू फिलोमेनो कॉस्ता, डॉ. मनोज प्रभुदेसाई, हे मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेत प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तु गोळा करण्यावर जास्त भर देण्यात आला.

क्रीडा  खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले क्रिडापटू व शारिरीक शिक्षणाचे शिक्षक.
एक दिवसीय विक्रेता मेळाव्याचे आयोजन

सुमारे 40 बॅगा तर दुसऱ्या दिवशी 45 पिशव्या एकत्रीत करण्यात आल्या. या कार्यक्रमाला नामवंत खेळाडू व क्रिडा संबंधीत व्यक्ती उपस्थित राहिले. असे एपीईओ सालसेत लक्ष्मीदास मंगेशकर यानी कळविले आहे. या स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात तालुका क्रिडा अधिकारी मंथन आडपईकर, जिल्हा क्रीडा अधिकारी तुळशीदास देसाई व इतर कर्मचाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली.

Related Stories

No stories found.