Goa: कोरोनाकाळात बंद झालेली क्रूज सेवा पुन्हा सुरु
मुरगाव बंदरात दाखल झालेले पर्यटक जहाजDainik Gomantak

Goa: कोरोनाकाळात बंद झालेली क्रूज सेवा पुन्हा सुरु

जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पूर्वसंध्येला मुरगाव हार्बर एमपीटी (MPT) बंदरात क्रूज (Cruise) बर्थवर 1500 प्रवासी तसेच 600 कर्मचाऱ्यांना घेऊन दाखल झाले.

दाबोळी: मार्च 2020 नंतर कोविड (Covid 19) महामारीकाळात बंद असलेली क्रूज (Cruise) सेवेतील पहिले जहाज कोरडेलिया (Ship Cordelia) जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पूर्वसंध्येला मुरगाव हार्बर एमपीटी (MPT) बंदरात क्रूज बर्थवर 1500 प्रवासी तसेच 600 कर्मचाऱ्यांना घेऊन दाखल झाले.

गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे मुरगाव बंदरातील क्रूज सेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे पर्यटन हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. सागरी पर्यटन हंगाम पुर्णपणे बंद पडला होता. त्यामुळे टॅक्सी व्यवसाय, पर्यटक बस यांनाही वित्तहानीला सामोरे जावे लागले होते. तसेच एम पी टीचे खास क्रूस टरमिनल सागरी पर्यटन व्यवसाय बंद असल्याने, तसेच जहाजे न आल्याने ओसाड पडले होते.

मुरगाव बंदरात दाखल झालेले पर्यटक जहाज
Goa Election: दिदींच्या धमाक्याला सुरुवात, कॉंग्रेसला रामराम करत फालेरोंचा उद्या तृणमूलमध्ये प्रवेश

दरम्यान, 27 रोजी जागतिक पर्यटन दिन असून आज पूर्वसंध्येला क्रूज सेवेतील पहिले जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले. मुंबईहून कोरडेलिया हे पर्यटक जहाज आज सकाळी मुरगाव बंदरात 1500 प्रवासी तसेच 600 कर्मचारी घेऊन दाखल झाले. जे. एम. बक्शीच्या प्रयोजनाखाली सदर जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले.

मार्च 2020 नंतर क्रूज सेवा बंद होती ती आज सुरू झाली. एम व्ही कोरडेलिया यांच्या एकूण 50 हून अधिक गोव्यात येरादारी असून गोव्यातील पर्यटनाला वाव मिळण्यास या क्रूज सेवेतून मदत होणार असल्याचे बक्शीचे व्यवस्थापक गोविंद पेर्नूलकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com