गोव्यातील गुंडांना येत्या सहा महिन्यात तडिपार करणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गुन्हेगारांना येत्या सहा महिन्यात तडिपार कऱण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं. 

मडगांव : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकार गोव्यातल गुंडगिरी नष्ट कऱण्यासाठी कडक पावलं उचलणार असल्याचं सांगितलं आहे. गुन्हेगारी कार्यात सामील असलेल्या सर्वांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. फातोर्डा, किनारपट्टी भागात होणाऱ्या खून, हाफमर्डर, गॅंग वॉर यामध्ये सामील असणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अशा गुन्हेगारांना येत्या सहा महिन्यात तडिपार कऱण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं. 

गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून नौदल सिम्युलेटरच्या उभारणीस सुरूवात

काही दिवसांपूर्वीच गोव्याचा कुख्यात गुंड अन्ववर शेखवर प्राणघातक हल्ला कऱण्यात आला होती. या घटनेमुळे ग्यातील गुंडगिरीचा प्रश्न ऐरणावर आला. अनेवर नाईक हल्ला त्याच्या टोळीतील गुंडांशी झालेल्या अंतर्गत वैमनस्यामुळे करण्यात आला होता. अवैध वाळू उपशाच्या धंद्यात अन्वरला प्रवेश करायचा होता. या कारणामुळे झालेल्या वैमनस्यातून तसेत ड्रग्ज व्यापाराप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी अटक झालेला वेल डि कोस्टा याला त्याच्या अटकेमागे अनेवर शेखचा हात असल्याच संशय होता, त्यामुळे त्याने बदला घेण्याच्या हेतूने अन्वर शेखवर हल्ला केला. 

गोव्याचा कुख्यात गुंड अन्वर शेखवर 'बदले की आग में' झाला हल्ला

संबंधित बातम्या