Goa Corona Warriors: पंचायत सदस्य व नगरसेवक कोविड योद्धा म्हणून घोषित

Goa CM Dr. Pramod Sawant declared Panchayat members and corporators as corona warriors
Goa CM Dr. Pramod Sawant declared Panchayat members and corporators as corona warriors

पणजी: गोवा सरकारने(Goa Government) राज्यातील पंचायत सदस्य व नगरसेवकांना कोविड योद्धा(corona warriors) म्हणून घोषित करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक पंचाने व प्रत्येक नगरसेवकाने दररोज दहा जणांना लसीकरणासाठी(Vaccination) लसीकरण केंद्रावर न्यावे अशी जबाबदारी त्यांच्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी आज दिली.(Goa CM Dr. Pramod Sawant declared Panchayat members and corporators as corona warriors)

मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील पंच व नगरसेवकांकडे तसेच जिल्हा पंचायत सदस्यांकडे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले 45 वयोगटावरील दोन लाख जणांना अद्याप लस देणे बाकी आहे. नगरसेवक व जिल्हा पंचायत सदस्यांनी प्रत्येक दिवशी दहा जणांना लसीकरण केंद्रावर न्यावे आणि लस द्यावी. मतदानाच्या वेळी जसे मतदारांना हुडकून घराबाहेर काढले जाते तसेच लसीकरणासाठी लोकांना शोधून लसीकरण केंद्रावर नेण्यात यावे.

यावेळी पंच व नगरसेवकांनी त्यांचे स्वतःचे वय पंचेचाळीस वर्षाखालील असल्यामुळे त्यांना स्वतःला लस घेता येत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यासर्वांना कोविड योद्धा म्हणून सरकार घोषित करेल असे स्पष्ट केले. गृहअलगीकरणात राहिलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या लोकप्रतिनिधींवर मुख्यमंत्र्यांनी दिली. अंथरुणाला खिळून असलेल्याना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू केले जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com