Goa:संकटकाळातही राज्याचा विकास

मुख्यमंत्री : उर्वरित कामे सहा महिन्यांत मार्गी लावणार
Goa Cm Visit Sawardem
Goa Cm Visit SawardemDainik Gomantak

कुडचडे : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी भाजप (Goa) सरकार (Bjp) कटिबद्ध आहे. संकटामागून संकटे येत असतानाही विकास थांबला नाही. आगामी सहा महिन्यांत उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात येतील. ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr pramod Sawant) यांनी आज सावर्डे मतदारसंघाचा दौरा केला. रात्री आठ वाजता सावर्डेत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तत्पूर्वी सावर्डे- तिस्क येथून शेकडो दुचाकीस्वारांसोबत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने गिरीश भवन सभागृहात कार्यकर्ते आले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, (Dipak Pauskar) राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, माजी आमदार गणेश गावकर, शिरीष देसाई, सरपंच संदीप पाऊसकर, मंडळ अध्यक्ष विलास देसाई, मच्छिंद्र देसाई, मंडळ पदाधिकारी, सरपंच, पंच उपस्थित होते.

Goa Cm Visit Sawardem
Goa Police: चंद्रकांत बांदेकर हत्या प्रकरणात एकाला गुजरातमधून अटक

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, (Dr Pramod Sawant) गेली दोन वर्षे महामारीत गेली; पण कोणतीही योजना बंद केली नाही. कोविडमुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये देणारे गोवा हे प्रथम राज्य आहे. यावेळी नागरिकांनी समस्या मांडल्या. भूखंड किंवा आफ्रामेंतचा विषय आगामी दोन महिन्यांत सोडविण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले. यावेळी बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच यश सावर्डेकर या मुलाचाही सत्कार केला. पूरग्रस्तांना मंजुरीपत्रे देण्यात आली. यावेळी दीपक पाऊसकर यांनीही विचार व्यक्त केले. संदीप पाऊसकर यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. फळे, भाजी, दूध, फुले यात गोवा स्वयंपूर्ण होणार आहे. मागच्या सरकारने वेळीच खाण लीज परवान्यांचे नूतनीकरण केले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असे सांगून नाव न घेता सावंत यांनी दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यावर टीका केली. मोफत पाणी योजना आपण आखली, असे म्हणणाऱ्या सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी त्यांच्या कारकिर्दीत २० वर्षांत अशी योजना का राबवली नाही, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.

Goa Cm Visit Sawardem
Goa: राजीव गांधी देशाच्या डिजीटल पर्वाचे प्रवर्तक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com