Goa CM: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवारी मयेमध्ये...

कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, डिचोली दौरा मात्र रद्द (Goa CM Visit)
Goa CM: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवारी मयेमध्ये...
CM Dr Pramod Sawant (Goa CM)Dainik Gomantak

Goa CM: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Assembly Election 2022) राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Sawant) हे गुरुवारी 26 ऑगस्ट रोजी मये मतदारसंघाचा दौरा (Visit Mayem Constituency) करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर काही विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री दौरा करणार असल्याने मतदारसंघात ठिकठिकाणी भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी, 28 ऑगस्ट रोजी होणारा डिचोली मतदारसंघाचा दौरा मुख्यमंत्र्यांनी रद्द केला असल्याची माहिती मिळाली आहे.

CM Dr Pramod Sawant (Goa CM)
Goa Election: काँग्रेस निवडणूक निरीक्षक तथा पी. चिदंबरम् गोव्यात दाखल

सकाळी 9.30 वाजता शिरगाव येथील श्री लईराई देवीचे दर्शन घेवून मुख्यमंत्री आपल्या दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. शिरगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मये गावच्या सीमेवर स्वागत करण्यात येणार आहे. श्री महामाया देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते मये येथे नियोजित पाईपलाईल टाकण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात येणार आहे. नंतर मये पंचायत सभागृहात बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मयेतील बैठक आटोपून मुख्यमंत्री चोडण येथे रवाना होणार आहेत. दीनदयाळ योजनेंतर्गत चोडण येथे बांधण्यात आलेल्या मार्केट संकुल आणि सामाजिक सभागृह प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी चोडणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधणार आहेत.

CM Dr Pramod Sawant (Goa CM)
Goa Court: परवाना रद्द केल्याचे प्रकरणं दाखवा

दुपारी 3.30 वा. नार्वे पंचायतीत ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नंतर मुख्यमंत्री पिळगाव येथे रवाना होणार आहेत. पिळगाव येथील श्री शांतादुर्गा मंदिराजवळील संरक्षक भिंत प्रकल्पाची त्यांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. सायंकाळी 5 वा. म्हावळींगे येथे बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री कुडचिरे येथे कार्यकर्ते तसेच जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी वाठादेव येथे झांट्ये क्रीडा संकुलात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी कारापूर-तिस्क येथे सावंत सभागृहात होणाऱ्या बैठकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सांगता होणार आहे.

CM Dr Pramod Sawant (Goa CM)
Goa: शिवोलीत माझ्या कारकीर्दीत भरपूर विकासकामे झाली: विनोद पालयेंकर

डिचोलीचा दौरा लांबणीवर

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा डिचोलीतील नियोजित दौरा लांबणीवर पडला आहे (Bicholim's visit postponed). येत्या शनिवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत डिचोली मतदारसंघाचा दौरा करणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. दौऱ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.