अमलीपदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांवर कारवाईचे पोलिसांना पूर्ण स्वात्यंत्र: मुख्यमंत्री

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

सरकार अमलीपदार्थात गुंतलेल्या कोणासही पाठीशी घालणार नाही. पोलिसांनी मुक्तहस्ते कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहिती पोलिस महासंचालकांनी एका कार्यक्रमात दिली.

पणजी: हणजुणच्या रेव्ह पार्टीत अमलीपदार्थ कोणी पुरवले त्याला अटक करा. अमलीपदार्थ व्यवहाराचा कणा मोडून काढा, यासाठी पोलिस दलाला सरकारचा पूर्ण पाठींबा असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीणा यांना सांगितले आहे.

हणजुण येथे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी चर्चा करून सर्व पैलू जाणून घेतले होते. त्यानंतर हा आदेश त्यांनी दिला. सरकार अमलीपदार्थात गुंतलेल्या कोणासही पाठीशी घालणार नाही. पोलिसांनी मुक्तहस्ते कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहिती पोलिस महासंचालकांनी एका कार्यक्रमात दिली.

पोलिस महासंचालकांनी सांगितले की, पर्यटकांचे स्वागत आहे. त्यांनी येथे येऊन भटकंती करावी, निसर्ग न्याहाळावा, मेजवान्याही कराव्यात पण त्यात अमलीपदार्थांचा वापर अजिबात नको, अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका विशद केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, होते गोव्याच्या शांत व निसर्ग सुंदर वातावरणात अमलीपदार्थांचा थारा नाही. अमलीपदार्थांची पाळेमुळे खोदून काढण्यास पोलिसांनी मागेपुढे पाहू नये. अमलीपदार्थ व्यवहारांचे जाळे नष्ट करण्यास पोलिसांना पूर्ण मोकळीक आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या