गोवा नगरपालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्र्यांनी दिले विकास कामांच्या लोकार्पणाचे आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गोव्यात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत त्यानंतर येणाऱ्या आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने तयारी सुरू केली आहे.

पणजी : गोव्यात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत त्यानंतर येणाऱ्या आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. संमती दिलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लवकरात लवकर लोकार्पण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळांला ( GSIDC )  दिले आहेत.सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पूर्णत्वास आलेले प्रकल्पांचं लवकरात लवकर उद्घटन करावे असे निर्देश देण्यात आले.

गोव्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

महानगरपालिकेच्या बोर्डाच्या बैठकीचे अध्यक्ष असलेले सावंत यांनीही पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे यासाठी निर्देश जारी केले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी साखळी येथे नवीन सरकारी शाळेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली आणि जीएसआयडीसीला लवकरात लवकर पायाभरणी करण्यास सांगितले. सावंत यांनी अधिकाऱ्यांना कॅन्सुलिम बाजार संकुलाचे उद्घाटन करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले.विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची कोणतीही योजना आजच्या घडीला नाही. अखेर निवडणूक कधी घ्यायची, हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय असतो.

गोव्यात आजपासून घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागणार

तो निर्णय घेण्यास भाग पाडण्यासारखी परिस्थिती (विधानसभा बरखास्ती वैगेरे) निर्माण केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. सध्या मुख्यमंत्री राज्यभराचा दौरा करत आहेत. भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे असो वा युवा संमेलने मुख्यमंत्री निवडणूक प्रचारादरम्यान करावयाच्या भाषणांसारखी भाषणे करत आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर आता पालिका निवडणुका जिंकण्याची भाजपची तयारी आहे. तशातच इतर पक्षातील नेते कार्यकर्ते भाजपमध्ये येत असतील त्यांना प्रवेश देण्याची तयारी करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे विरोधी पक्षांकडून भाजप मुदतपूर्व निवडणुका घेईल, अशी शक्यता वर्तवत आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळली.

 

 

संबंधित बातम्या