मुख्यमंत्र्यांना गोव्यापेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांचीच जास्त काळजी

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

सिंधुदुर्गला ऑक्सिजन पाठविण्याच्या निर्णयावर गोव्यातून चौफेर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्यातून गोमंतकीयांपेक्षा त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांचे जास्त पडून गेल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. 

सासष्टी: सिंधुदुर्गला(Sindhudurg) ऑक्सिजन(Oxygen) पाठविण्याच्या निर्णयावर गोव्यातून(Goa) चौफेर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्यातून गोमंतकीयांपेक्षा त्यांना महाराष्ट्रातील(Maharashtra) नागरिकांचे जास्त पडून गेल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. गोव्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना, सिंधदुर्गवासीयांची बाजू घेवून बोलणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑक्सिजनसाठी तडफडणाऱ्या गोमंतकीय कोविड रुग्णांचा अपमान केला आहे, असा आरोप दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस(South Goa congress) अध्यक्ष जोसेफ डायस(Joseph Dias) यांनी केला. 

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोमंतकीयांना डावलून सिंधुदुर्गात ऑक्सिजन पाठविण्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा डाव उघड केल्याने मुख्यमंत्र्यांनी काल दिगंबर कामत यांच्यावर तथ्यहीन आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व त्यांनी आमच्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याची माफी मागावी, अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली. कॉंग्रेस पक्षाने नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्याचेच धोरण राबविले आहे. आम्हाला महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांची चिंता आहे, परंतु आपल्या लोकांची काळजी घेणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून आपल्या लोकानंतरच इतरांना मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Goa CM Pramod Sawant agrees to supply oxygen to Sindhudurg)

कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम; डिचोलीत कोविड सक्रिय रुग्णसंख्येत घट 

गोव्यातील भाजप सरकारने नेहमीच गोमंतकीयांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजप सरकारने आमची जीवनदायिनी म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला. आता गोमंतकीयांचे आरोग्य सांभाळण्याचे सोडून मुख्यमंत्री महाराष्ट्रातील रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत. भाजप सरकारने गोव्यातील कोविड व ऑक्सिजन व्यवस्थापनावर श्वेतपत्रिका जारी करण्याची धमक दाखवावी. आज लोक मदतीसाठी हाक मारत असताना भाजपचे नेते व कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. युवक कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसचे कार्यकर्ते गरजूंना प्राणवायू, जेवण तसेच इतर मदत देत असताना भाजपच्या आमदारांचा कोठेच पत्ता नाही, असेही जोसेफ डायस यांनी स्पष्ट केले. 

कोलवाळ कारागृहात कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता 

संबंधित बातम्या