गोव्यामध्ये ऐन सणासुदीच्या काळात 'बीफ'चा तुटवडा होऊ देणार नाही ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

PTI
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात असणाऱ्या बीफच्या तुटवड्याची आपल्याला कल्पना असून, ऐन सणावाराच्या काळात असे होऊ नये याकरिता आपण लवकरात लवकर पावले उचलणार असल्याचं वक्तव्य केलं.

पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात असणाऱ्या बीफच्या तुटवड्याची आपल्याला कल्पना असून, ऐन सणावाराच्या काळात असे होऊ नये याकरिता आपण लवकरात लवकर पावले उचलणार असल्याचं वक्तव्य केलं. कर्नाटक सरकारने जनावरांच्या कत्तलींवर बंदी घातल्याने कर्नाटकातून गोव्यात येणारे मांस बंद होणार असल्याने गोव्यात मांसाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मांस दरातही मोठी वाढ होणार आहे. गोमंतकीयांना पुरेसे आणि वाजवी दरात मांस उपलब्ध करण्याची कोणतीही योजना राज्य सरकारकडे नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते यांनी केली. 

दरम्यान, कर्नाटकातून आयात होणारे बीफ बंद करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमव यांनी केली आहे. तसंच, राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल अल्मेडो यांनी या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात असणाऱ्या गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेड इथं पुन्हा एकदा कत्तलखाना सुरु करावा अशी मागणी केली आहे. गोव्यामध्ये गाईंच्या कत्तलींवर बंदी घालण्यात आली आहे. पण, बैल आणि म्हैस यांचे मांस विक्री करण्याची पवानगी काही प्रमाणपत्र प्राप्त कत्तलखान्यांना देण्यात आली होती. 

संबंधित बातम्या