गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

महाराष्ट्रामध्ये शिवचरीत्र घराघरात पोहोचवणारे जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली
Goa CM Pramod Sawant Tribute to senior Shivshahir Babasaheb PurandareDainik Gomantak

जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे दु: खद निधन झालं आहे. त्यांना वयाच्या 100 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवचरीत्र घराघरात पोहोचवणारे बाबासाहेब पुरंदरे. आपल्या वक्तृत्वाने मराठी माणसांची मने त्यांनी जिंकली होती. दरम्यान आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील शोक व्यक्त करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा तब्बल साठहून अधिक वर्षे प्रयत्न करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कालच रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते की, बाबासाहेब गेल्या आठवडापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती.

बाबासाहेबानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्या ग्रंथास वाचकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रातच नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेबांनी लिहिलेल्या शिवचरित्राची चर्चा असते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांनी त्या शिवचरित्राचे पारायण केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com