
CM Pramod Sawant: प्लास्टिक उत्पादनांच्या कृषीतील वापरासोबतच प्लास्टिकचा समाजावर होणार परिणाम तसेच त्याच्या पुनर्वापरावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गास्पार दी डायस येथे आयोजित प्लास्टिव्हिजन कार्यक्रमाअंतर्गत प्लास्टिकल्चर ॲण्ड मायक्रोन्यूट्रीएंड कार्यशाळेच्या उद्घाटनसमयी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी अखिल भारतीय प्लास्टिक उत्पादन संघटनेचे संचालक चंद्रकांत तुराखिया, कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, मुंबई येथे 7 ते 11डिसेंबरदरम्यान आयोजित प्लास्टिव्हीजन कार्यक्रमाला आमचे अधिकारी भेट देतील. गोव्याच्या अनुषंगाने कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत त्याबाबत माहिती घेतील.
कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो म्हणाले, कृषी क्षेत्रात प्लास्टिकचा वापर पाणी साठविण्यासाठी, ड्रीपिंग करण्यासाठी तसेच इतर गोष्टींसाठी केला जातो.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते व गरजेप्रमाणे पाणी शेतीसाठी वापरता येते. प्लास्टीकचा वापर करत असताना आपण पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे.
येतील 30 देशांचे प्रतिनिधी : ‘प्लास्टिव्हिजन २०२३’ या मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील ३० देशांचे सुमारे पंधराशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या भव्य प्रदर्शनात कृषी, प्लास्टिक, आरोग्य, रोजगार तसेच इतर विविध घटकांचा समावेश असून यासंबंधी येथे माहिती प्राप्त होणार असून आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन चंद्रकांत तुराखिया यांनी सांगितले.
400 कोटींची इंडस्ट्री
नारळाचा केवळ खाद्यपदार्थ म्हणून वापर न करता त्यापासून विविधांगी वस्तू बनविता येतात. नारळाचा काथा ही 400 कोटींची इंडस्ट्री आहे. याबाबत आम्ही विचार करत नाही. नारळाकडे केवळ खाद्यउत्पादन म्हणून न पाहता एक इंडस्ट्री म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.