...तोपर्यंत अभ्‍यास सुरू ठेवा

Goa CM Pramod Sawant will take a decision in the interest of the students
Goa CM Pramod Sawant will take a decision in the interest of the students

पणजी: विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितासाठी दहावीची परीक्षा रद्द करावी लागत असेल, तर तसा निर्णय सरकार घेईल. सध्या तरी कोविडचा प्रसार आटोक्यात येतो की नाही, यावर सरकारचे लक्ष आहे. दहावीची परीक्षा होणार की नाही, या संभ्रमावस्थेत सरकार 24 हजार विद्यार्थी व त्यांचे पालक यांना फारवेळ ठेवणार नाही. येत्या काही दिवसात सरकार आपली याविषयीची भूमिका स्पष्ट करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.(Goa CM Pramod Sawant will take a decision in the interest of the students)

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव असे वृत्त ‘गोमन्तक’ने दिले होते. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही राज्यांनी दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्रीय पातळीवर तसा निर्णय झालेला आहे. त्या साऱ्याची माहिती गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरकारकडे आलेली आहे. त्यावर सरकारचा विचार सुरू आहे. त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. 

देशात अनेक मंडळानी दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्या परीक्षेसाठी बसू इच्छीणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय अनेक राज्यांतील मंडळांनी घेतला आहे. काही राज्यांच्या मंत्रिमंडळात तसा निर्णय घेतला गेला आहे. त्याच धर्तीवर राज्यातही दहावीसाठी बसू इच्छीणाऱ्या 24 हजार विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करावे लागले, तर काय याचा विचार मंडळाच्या पातळीवर सुरू आहे. 

मार्गदर्शक तत्त्‍वांसाठी तयारी सुरू
दहावीतील सर्वांनाच उत्तीर्ण केले तर अकरावीतील प्रवेशाचा गुंता कसा सोडवावा हा प्रश्न चर्चेला आला आहे. सीबीएसईप्रवेश देताना कोणते निकष लावावेत याविषयी मार्गदर्शक तत्त्‍वे तयार करत आहे. ती मार्गदर्शकत तत्त्‍वे शिक्षण मंडळांना पाठवली जातील.

...तोपर्यंत अभ्‍यास सुरू ठेवा
शिक्षण मंडळ आणि सरकारनेही ‘तूर्त थांबा व पाहा’ अशी भूमिका घेतली आहे. परीक्षा घेण्यासाठी आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण पुढील महिन्यात तयार होते असे दिसले तर परीक्षा घेण्याविषयी विचार होऊ शकतो. कोविड प्रसार रोखणे शक्य झाले नाही, तर परीक्षेसाठी म्हणून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जाणार नाही. तशा परिस्थितीत परीक्षा रद्द करण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही. परंतु, सरकार निर्णय घेईपर्यंत विद्यार्थ्यांनी घराच्या घरी अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. त्यांनी केलेला अभ्यास फुकट जाणार नाही, आयुष्यात पुढे त्या ज्ञानाचा कुठे ना कुठे उपयोग होणारच आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com