Goa : कोरोना काळात अनाथ झालेल्यांना मुख्यमंत्र्याचा मदतीचा हात

Goa: CM's helping hand to orphans during Corona period
Goa: CM's helping hand to orphans during Corona period

पणजी : राज्यात कोविड (Covid -19) काळात कुटुंबातील कमवता सदस्याचा मृत्यू झालेल्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांसाठी दोन लाखांची मदत, दहावी व त्यावरील शिक्षण घेणाऱ्या अनाथ मुलांसाठी मोफत लॅपटॉप (Laptop) योजना, बचपनप्रमाणेच मुख्यमंत्री अनाथ आधार योजना, दुर्बल पंचायतींसाठी ५० हजारांची मदत आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३५ व्या घटकराज्य दिनानिमित्त जाहीर केली. गोवा (Goa) राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी गोमंतकियांनी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला आभासी पद्धतीने संबोधित करताना केले. या दिनानिमित्त राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.  

गोवा घटकराज्य होण्यापूर्वी संघ प्रदेश होता व गोवा दमण व दीव असे नाव होते. त्यामुळे गोव्यातील अनेक कायदे हे त्याच नावाने आहेत. हे कायदे गोव्यासाठी आहेत त्यामुळे यापुढे विधीमंडळावर फक्त गोवा हे नाव राहील व दमण व दिव यापुढे असणार नाही यासाठी कायदा खात्याला आवश्‍यक ते सोपस्कार करण्यास सांगण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व मंत्री घटकराज्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम तसेच नवीन योजना जाहीर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत शुभेच्छा देत केंद्राने राज्यांसाठी राबविलेल्या योजना गोव्यातील सरकारने गोमंतकियांसाठी राबवत आहोत. ग्रामपंचायतीचे गोव्याच्या विकासामध्ये व योजना रबविण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. राज्याची प्रगती न थांबता ती सदोदित सुरू राहावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. 

तौक्ते चक्रीवादाळात राज्याचे मोठे नुकसान झाले. १९९४ नंतर हे असे भयानक वादळ गोव्यात आले. या वादळात सरकारी व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या लोकांचे नुकसान झाले त्यांना सरकारने काही दिवसांतच भरपाईची मदत त्यांच्यापर्यंत पोहचवली. सुमारे ७० टक्के लोकांना ही मदत देण्यात आली असून उर्वरितांना लगेच दिली जाईल. बांधकाम व वीज खात्याला याचा मोठा फटका बसला तरी त्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेले कष्ट अभिनंदनीय आहे. 

राज्यात कोरोना महामारीचा फैलाव वाढला होता मात्र गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण तसेच कोरोना संसर्गाचे प्रमाणही बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. सरकारने या काळात उत्तमोत्तम व्यवस्थापन देण्याचा प्रयत्न केला. गोवा कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. 

राज्यात कोरोनामुळे अनेक कुटुंबातील कर्ता व कमावता सदस्याचे निधन झाले तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आर्थिक सहाय्य म्हणून दोन लाख रुपये दिले जाणार आहे व त्याची अधिसूचना लवकरच काढली जाईल. राज्यातील ४५ वर्षावरील सर्व लोकांना लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे त्यासाठी पुन्हा टिका उत्सव सुरू केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १८ ते ४५ वर्षाखालील लोकांना लसीकरणाबाबत चिंता आहे त्याची दखल घेऊन येत्या ३ जूनपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. २ वर्षाखालील मुलांच्या पालकांना, व्याधीग्रस्त लोकांना, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, मोटारसायकल पायलट, दिव्यांग, खलाशी यांना प्राधान्यक्रमाने लसीकरण दिले जाईल असे सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com