गोवा किनारी आराखड्यास २०२१ पर्यंत मुदतवाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

कोविड महामारी आणि पावसाळी वातावरण यामुळे आराखडा तयार करण्‍याचे काम मागे पडल्‍याचे कारण सरकारने दिले आहे.

पणजी: गोवा किनारी क्षेत्र व्‍यवस्‍थापन आराखडा तयार करण्‍यासाठी राज्‍य सरकारने आज १० मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढवून मागितली आहे. तसा अर्ज राज्‍य सरकारने राष्‍ट्रीय हरित लवादासमोर सादर केला. हा आराखडा तयार करण्‍याची मुदत फेब्रुवारीमध्‍येच संपली होती. 

कोविड महामारी आणि पावसाळी वातावरण यामुळे आराखडा तयार करण्‍याचे काम मागे पडल्‍याचे कारण सरकारने दिले आहे. चेन्नई येथील केंद्र सरकारच्‍या संस्‍थेकडे हे काम सोपविण्‍यात आले आहे. या परवान्याअभावी किनारी भागातील बांधकाम परवाने आणि इमारत दुरुस्‍ती परवाने अडले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या