गोव्यात नारळ हा कुटुंबातील सदस्यासारखा : सेड्रिक कॉस्ता

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

२ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मडगाव येथील सेड्रिक कॉस्ता यांनी सांगितले की, गोव्यात नारळ हा कुटुंबातील एका सदस्यासारखा आहे.

फातोर्डा: २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मडगाव येथील सेड्रिक कॉस्ता यांनी सांगितले की, गोव्यात नारळ हा कुटुंबातील एका सदस्यासारखा आहे. नारळाशिवाय गोव्यात खाण-जेवणाला महत्त्वच रहात नाही. नारळाचे अनेक उपयोग आहेत. गोव्यामध्ये नारळाला भरपूर महत्त्व आहे. नारळा शिवाय गोमंतकीय एक दिवसही राहू शकत नाही.

नारळातून माणसाला आवश्यक जीवनसत्वाचा पुरवठा होतो. या मध्ये विटामीन्स, कॅलरीज, मिनरल्स याचा अंतर्भाव आहे. जेवणामध्ये आम्ही वापरत असलेल्या नारळाच्या कातलेल्या खोबऱ्यापासून पचनशक्ती वाढते असेही त्याने सांगितले. नारळापासून तयार केलेले फेणी हे पेय सुद्धा आरोग्यदायी असल्याचे त्यांनी सांगितले. नारळाच्या झाडातून मिळणाऱ्या रसातून गुळही तयार केला जातो, ज्याचा वापर गोव्यात होत असल्याचे त्याने सांगितले.

दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनीही जागतिक नारळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कुठल्याही कामाची सुरवात, आमचे जेवण व आर्थिक मदत करणारे महत्त्व नारळात आहे. आमची संस्कृती, धर्माचरण, मंगलकाम, जेवण-खाण या सर्व ठिकाणी नारळ अपरिहार्य आहे, असे सावईकर यांनी सांगितले.

नारळ विकास मंडळाची स्थापना...
भारतात या जागतिक दिना व्यतिरिक्त २६ जून रोजी ‘राष्ट्रीय नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतात नारळाच्या उत्पादनाला व व्यापाराला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी १२ जानेवारी १९८१ या दिवशी केंद्रीय शेती मंत्रालयाच्या अधिपत्याखाली नारळ विकास मंडळाची स्थापना केली असून, हे मंडळ अजूनही कार्यरत आहे. ‘जगाच्या संरक्षणासाठी नारळ उत्पादनात गुंतवणूक करा’ हे यंदाच्या जागतिक नारळ दिनाचे घोषवाक्य आहे.

संबंधित बातम्या