Goa: नवरात्रोत्सव निमित्त '101 सामूहिक सत्यनारायण' पूजा संकल्प संपन्न

सत्यनारायण पूजा नंतर सिमोलंघन, सोने लुटणे आदी कार्यक्रमांनिशी दसरोत्सव (Dussehra) साजरा करण्यात येणार आहे.
Goa: नवरात्रोत्सव निमित्त '101 सामूहिक सत्यनारायण' पूजा संकल्प संपन्न
शांतादुर्गा देवस्थानात एकशे एक सामूहिक सत्यनारायण पूजा उत्साहात संपन्न Dainik Gomantak

डिचोली: गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात वार्षिक नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येत असून, रविवारी 101 सामूहिक सत्यनारायण पूजेचा संकल्प पार पडला. दांपत्यांसह देवीच्या भक्तगणांनी (devotees) या सामूहिक धार्मिक सोहळ्यात भाग घेतला होता.

या सोहळ्यावेळी मंदिरात मंगल आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती येत होती. या संकल्पावेळी भाविकांनी गर्दी केली होती. सत्यनारायण पूजा विधीसह कुंकूमार्चन आदी धार्मिक विधीही पार पडले. सायंकाळी शिवोली येथील स्वामी समर्थ भजनी मंडळातर्फे भजन करण्यात आले. ह. भ. प. रामदास अय्यरबुवा यांचे कीर्तन झाल्यानंतर मखरोत्सव पार पडला.

शांतादुर्गा देवस्थानात एकशे एक सामूहिक सत्यनारायण पूजा उत्साहात संपन्न
Goa: क्रिकेट संघाच्या शिबिराला होणार सुरुवात

15 रोजी दसरोत्सव:

या देवस्थानचा वार्षिक दसरोत्सव येत्या शुक्रवारी रोजी पारंपरिक (Traditional) पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी देवीस महाभिषेक आदी विधी होणार आहेत. सायंकाळी 5 वा. तरंगांची पूजा नंतर सिमोलंघन, सोने लुटणे आदी कार्यक्रमांनिशी दसरोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री शांतादुर्गा देवस्थान (Shantadurga Temple) ग्रामस्थ गावकर मंडळाने दिली.

Related Stories

No stories found.