डिचोलीत भाताच्या 'कापणी आणि मळणी'च्या कामांची लगबग

पिळगाव, मये आदी भागात भात कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरु
डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी वरगाव येथे जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जि पं सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते.
डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी वरगाव येथे जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जि पं सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते.Dainik Gomantak

Goa: डिचोली (Bicholim) तालुक्यातील बहूतेक सर्व भागात भात पूर्णपणे पिकून तयार झाले (Rice Production) असून, सध्या भातकापणी आणि मळणीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने कृपादृष्टी केली आणि वेळेवर कापणी यंत्रे उपलब्ध झाली, तर येत्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या पिळगाव, मये आदी भागात भात कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरु आहेत. काही शेतकऱ्यांनी ही कामे आटोपूनही घेतली आहेत. कृषी क्षेत्रात आधुनिकतेचा शिरकाव झाल्यापासून क्वचित ठिकाणी वगळता बहूतेक भागात यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी वरगाव येथे जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जि पं सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते.
कोविड लसीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न कौतुकास्पद: मडकई भाजप

कृषी खात्याकडून अनुदान

यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याची कृषी खात्याची योजना आहे. यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्यासाठी प्रति तासामागे 2 हजार 400 रुपये भाडे आकारण्यात येते. तर कृषी खात्याकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना कापणी आणि मळणीच्या भाड्यापोटी प्रति तासामागे केवळ बाराशे रुपये भरावे लागतात.

पारंपरिक पद्धतीने कापणी

शेतीचे कमी प्रमाण आणि चिखल वा अन्य कारणामुळे ज्या शेतीत कापणी यंत्र नेणे शक्य होत नाही. त्या शेतीत शेतकऱ्यांना परंपरिक पद्धतीने कापणी आणि मळणीची कामे आटोपून घ्यावी लागतात. यासाठी कामेरी आणि मानाय मिळणे दुरापास्त तर होत आहेतच, उलट या मजुरांची मजुरीही परवडत नाही. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पिळगाव भागातील काही शेतीत पारंपरिक पद्धतीने भाताची कापणी करण्यात आली आहे.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी वरगाव येथे जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जि पं सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते.
मोबाईल चोर अखेर गजाआड

कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी आज (मंगळवारी) वरगाव भागात जाऊन भात कापणी आणि मळणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर तसेच शेतकरी उपस्थित होते. पावसाच्या व्यत्ययाशिवाय वेळेवर कामे पूर्ण झाल्यास भातपिक समाधानकारक मिळणार असल्याचा दावा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com